For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोयनेतून आजपासून 7 हजार क्युसेक्स विसर्ग

10:53 AM Jul 15, 2025 IST | Radhika Patil
कोयनेतून आजपासून 7 हजार क्युसेक्स विसर्ग
Advertisement
सांगली :
कोयना धरणातून आज मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सहा वक्र दरवाजे एक फूट 6 इंच उघडून 5000 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये आता एकूण 7100 क्युसेक विसर्ग सुरू होईल. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  कोयना धरणातील आजचा पाणीसाठा, धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणात होणारी आवक आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेत कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित  ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
  •  वारणेत 27.88 टी.एम.सी. 
 जिल्ह्यातील  वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 27.88 टी.एम.सी. पाणीसाठा आहे .या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 74.30 (105.25), धोम 10.12 (13.50), कन्हेर 7.68 (10.10), धोम बलकवडी 2.30 (4.08), उरमोडी 7.26 (9.97), तारळी 4.95 (5.85), वारणा 27.88 (34.40), राधानगरी 6.87 (8.36), दूधगंगा 17.78 (25.40), तुळशी 2.77 (3.47), कासारी 1.97 (2.77), पाटगांव 3.36 (3.72), अलमट्टी  95.47 (123).
  सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे - कोयना धरणातून 2100, कण्हेर 40, उरमोडी 300, तारळी 800, वारणा 4500, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी  300, पाटगाव 300, हिप्परगी बॅरेज 54 हजार 654 व अलमट्टी धरणातून 20 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.