महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणात 70 टक्के लोकांकडे बीपीएल कार्ड

06:06 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नायब सिंह सैनी करणार चौकशी

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

हरियाणातील 1.98 कोटी लोक बीपीएलच्या कक्षेत आहेत. ही संख्या राज्याच्या 70 टक्के लोकसंख्येच्या समीप आहे. एकीकडे हरियाणा दरडोई उत्पन्नाप्रकरणी दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दुसरीकडे राज्यात मोठ्या संख्येत बीपीएल कार्डधारक कसे असा प्रश्न उपस्थित आहे. हरियाणा सरकारने आता याप्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.

हरियाणात स्वयंघोषणा म्हणजेच एखाद्याने आपण दारिद्र्यारेषेखाली आहोत असे जाहीर केल्यास त्याला बीपीएल कार्ड प्रदान करण्यात येते. परंतु बीपीएल कार्डधारकांची संख्या खूपच वाढल्याने राज्य सरकारला आता पाऊल उचलावे लागले आहे.

राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेनुसार हरियाणात मागील दोन वर्षांमध्ये 75 लाख नव्या बीपीएल कार्डधारकांची भर पडली आहे. हा आकडा अत्यंत मोठा आणि चकित करणारा आहे. हरियाणा हे देशातील समृद्ध राज्यांपैकी आहे. गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्यांच्या तुलनेतही हरियाणाचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. अशास्थितीतही राज्यातील बहुतांश लोकसंख्या बीपीएलच्या कक्षेत आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

डिसेंबर 2022 पर्यंत राज्यातील 1.24 कोटी लोक बीपीएलच्या कक्षेत होते. चालू वर्षात आतापर्यंत हा आकडा जवळपास 2 कोटी झाला आहे. इतक्या वेगाने बीपीएल कार्डधारक कसे वाढले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. चालू वर्षातील लोकसभा निवडणूक आणि अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे बीपीएल कार्ड्स जलदपणे तयार करवून घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article