भारतात 70 टक्के कंपन्या व्यवसाय करण्याच्या तयारीत
इंडिया जीसीसी लँडस्केपचा 2030साठीच्या योजनेवर अहवाल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत-आधारित ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसीएस) ने गेल्या पाच वर्षांत देशाच्या तंत्रज्ञानाच्या लँडस्केपला आकार दिला आहे. नॅसकॉम आणि झिनोव्ह यांनी जारी केलेल्या ‘इंडिया जीसीसी लँडस्केप अहवालात द 5-इयर जर्नी’ नुसार, फॉर्च्युन 500 कंपन्यांपैकी 70 टक्के कंपन्या 2030 पर्यंत भारतात त्यांची उपस्थिती वाढवणार असल्याचा अंदाज आहे. प्राप्त अहवालानुसार, 2030 पर्यंत जीसीसीचा महसूल 9.9 अब्ज ते 10.5 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकेल, जो सध्याच्या 4.6 बिलियनपेक्षा 9-10 टक्क्यांनी वाढणार आहे. जीसीसीची संख्या सध्याच्या 1,700 वरून 2030 पर्यंत 2,100-2,200 पर्यंत वाढू शकते.
वाढणारा टॅलेंट पूल
नॅसकॉमच्या चेअरपर्सन सिंधू गंगाधरन म्हणाल्या, ‘जीसीसी ऑपरेटिंग सेंटर्सपासून नवोन्मेष आणि धोरणात्मक वाढीच्या खऱ्या इंजिनापर्यंत वेगाने विकसित झाले आहेत. जसजसे ते परिपक्वतेकडे वाटचाल करत आहेत, तसतसे ते जागतिक अजेंडाचे नेतृत्व करण्यासाठी, महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय भूमिका सुरक्षित करण्यासाठी आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला आकार देण्यासाठी वाढत्या प्रमाणात तैनात केले जात आहेत. यामुळे भारताला डिजिटल परिवर्तन आणि शाश्वत व्यवसाय पद्धतींमध्ये जागतिक नेता बनण्यासाठी एक व्यासपीठ तयार होईल. जीसीसी केंद्रांमधील वाढीमुळे टॅलेंट पूल देखील विस्तारत आहे. अहवालानुसार, जीसीसीमधील कर्मचाऱ्यांची संख्या 2023 पर्यंत 25-28 लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, सध्याला 19 लाख इतकी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. झिनोव्हचे सीईओ परी नटराजन म्हणाले, ‘भारत कोणत्याही शंकाशिवाय उण्ण् ची जागतिक राजधानी बनला आहे.
कंपन्यांना भारतात व्यवसाय का वाढवायचा आहे
या वाढीच्या प्रमुख कारणांमध्ये भारतातील जागतिक भूमिकांचा विस्तार, एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्स, अभियांत्रिकी, संशोधन आणि विकासवर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे.