महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फळपिक विमा योजनेंतर्गत ३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटीची भरपाई

05:38 PM Nov 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मंत्री राणे, चव्हाणांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ; जिल्ह्याध्यक्ष प्रभाकर सावंत

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

Advertisement

प्रधानमंत्री फळपीक योजनेंतर्गत ३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटीची भरपाईची रक्कम इन्शुरन्स कंपनींच्या माध्यमातून आजपासून शेतकऱ्यांच्या खाती जमा होणे सुरू झालेले आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे नेमका पाठपुरावा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मुळे शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली आहे असे सांगत मंत्री राणे व चव्हाण याचे विशेष आभार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केले आहेत.
जिल्ह्यातील ३४ हजार शेतकरी मित्रांना ७० कोटी इतकी भरपाई रक्कम प्राप्त होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडे पक्षाच्या वतीने आग्रही पाठपुरावा करण्यात आला होता.यातील तांत्रिक अडचणींची जाणीव असूनही विरोधी पक्षातील नेतेमंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी आंदोलनांची नौटंकी करत होते,पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने भरपाई जमा झाली. असा कांगावा आता सुरू करतील.पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात भाजपा सरकार सन्माननिधी म्हणून प्रतिवर्षी हजार रुपये जमा करते ते शेतकरी बांधव अश्या कांगाव्याला भीक घालत नाहीत.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे.भरपाई मिळण्यास थोडा विलंब झाला हे मान्य आहे,पण भाजपा सरकारच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सन्मान देतं याची जाणीवही समस्त शेतकरी वर्गाला आहे.आमदार नितेश राणे,निलेश राणे,राजन तेली या मंडळींनी सुद्धा योग्य प्रकारे पालकमंत्री यांच्याकडे हा विषय आग्रहाने मांडला, या सर्वांची परिणीती म्हणून अगदी सणासुदीच्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात ही भरपाई रक्कम जमा होत आहे यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि युतीच्या सर्वच नेत्यांनाही खूप आभार आहेत असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केले आहेत.

 

Advertisement
Tags :
# prabhakar sawant# bjp # tarun bharat news#
Next Article