For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेंबूर येथे भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू

06:27 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेंबूर येथे भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू
Advertisement

रविवारी पहाटेची घटना : मुख्यमंत्र्याकडून दुर्घटनास्थळाची पाहणी

Advertisement

मुंबई : प्रतिनिधी

चेंबूर (पूर्व), सिद्धार्थ कॉलनी येथील चाळीत एक मजली घर आणि दुकान  असलेल्या वास्तूमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत गुप्ता कुटुंबातील 6 ते 15 वयोगटातील दोन मुली ,एक मुलगा आणि ज्येष्ठ महिलेसह अन्य दोन महिला आणि एक पुरुष अशा एकूण 7 जणांचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे सदर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री Eिशदे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.

Advertisement

अग्निशमन दल आणि मुंबई महापालिका आपत्कालीन विभाग यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चेंबूर (पूर्व), ए. एन. गायकवाड मार्ग, प्लॉट नंबर 16/1  सिध्दार्थ कॉलनी येथील चाळीत रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास सर्व रहिवासी गाढ झोपेत असताना गुप्ता कुटुंबाच्या दुकानात अचानकपणे आग लागल्यामुळे एकच गोधळ उडाला. आग लागल्याने स्थानिक रहिवासी झोपेतून जागे झाले. काही स्थानिक लोक मदतीला धावले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच जवानांनी तत्काळ 4 फायर इंजिन, 2 जंम्बो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

दरम्यान, या आगीतून गंभीर जखमी 7 जणांना बाहेर काढून तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  सदर आग का आणि कशी काय लागली, त्यामध्ये गुप्ता कुटुंबातील 7 व्यक्तींचा मृत्यू कसा काय झाला, याबाबत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

मृतांची नावे:

प्रेम छेदिराम गुप्ता (वय 30), मंजू प्रेम गुप्ता (30), प्रेसी प्रेम गुप्ता (6), नरेंद्र गुप्ता (10) , गीतादेवी धरमदेव गुप्ता (60) अनिता धरमदेव गुप्ता (39) आणि विधी छेदिराम गुप्ता (15)

 

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत - मुख्यमंत्री

चेंबूर येथील सिद्धार्थनगरमधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री Eिशदे यांनी या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल, तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.