साग चोरीप्रकरणी 7 जण ताब्यात
लांजा :
तालुक्यातील कुर्णे येथील राखीव जंगलातून साग झाडांची चोरी केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील पुंभवडे येथील सात जणांना वनविभागाने ताब्यात घेतले. या कारवाईत 3 लाख 14 हजार 790 ऊपये किंमतीच्या सागाच्या 31 ओंडक्यांसह सुमारे 25 लाखांची क्रेन असा एकूण 28 लाख 14 हजार 790 ऊपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 30 ऑगस्ट रोजी ही चोरी झाली होती.
मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रुघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर आणि शुभम रवींद्र गुरव अशी त्यांची नावे आहेत. 30 ऑगस्ट रोजी वनपाल सारीक फकीर व वनरक्षकांना कुर्णे राखीव वन क्षेत्रात सात सागाच्या झाडांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले होते. तसेच त्यातील काही मुद्देमाल त्याच ठिकाणी आढळून आला होता, तर काही लंपास झाला होता. याप्रकरणी वनविभागाने अज्ञात चोरट्यांवर 30 ऑगस्ट रोजी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) फ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत 24 सप्टेंबरला या सातही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7.495 घनमीटरचे साग जप्त करण्यात आले.
माल माडबनमध्ये लपवल्याची कबुली
चौकशीत संशयित आरोपींनी चोरीचा साग माल रातोरात क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये भरून कुंभवडे येथे नेला. नंतर दुसऱ्या ट्रकमधून माडबनकडे नेऊन पठार नावाच्या ठिकाणी लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार वनविभागाने छापा टाकून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला. यावेळी चोरीसाठी वापरलेली क्रेन (एमएच 09 जीएम 0452) सुद्धा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कोल्हापूर वनसंरक्षक गुऊप्रसाद, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी जीतेंद गुजले, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, लांजा वनपाल सारीक फकीर, पाली वनपाल न्हानू गावडे, देवऊख वनपाल सागर गोसावी, वनपाल जी. एम. पाटील, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार, लांजा वनरक्षक नमिता कांबळे, कोर्ले वनरक्षक श्रावणी पवार, वनरक्षक विशाल पाटील, सूरज तेली, आकाश कुडकर, जालने मेजर, साबणे, सुप्रिया काळे यांनी केली. वनचोरी अथवा वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास त्वरित वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे..