For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

7 नवे आयपीओ बाजारात येणार

06:37 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
7 नवे आयपीओ बाजारात येणार
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

30 जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात  शेअर बाजारात 7 आयपीओ दाखल होणार आहेत. यासोबत जवळपास 19 कंपन्या शेअर बाजारात सुचीबद्ध होणार आहेत. वित्त, फॅशन, खाद्य, कृषी, रसायन व तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रातील कंपन्यांचे हे आयपीओ असतील.

7 पैकी 2 हे मुख्य बाजारात तर 5 एसएमई गटात आयपीओ खुले होणार आहेत. यात क्रीझॅकचा 2 जुलैला खुला होणार असून 233-245 रुपये प्रति समभाग किंमत असेल. 860 कोटी रुपये आयपीओतून उभारले जातील. टॅव्हल फूड सर्व्हिसेसचा आयपीओ 3 जुलैला खुला होणार असून 2000 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. बीएसई व एनएसईवर दोन्ही कंपन्या सुचीबद्ध होणार आहेत. एसएमई गटात वंदन फूडस्, मार्क लोइर फॅशन, सेडा टेक्स्टाईल, पुष्पा  ज्वेलर्स व सिल्की ओवरसीज यांचे आयपीओ 30 जूनला खुले झाले असून 2 जुलैला बंद होतील. 19.94 कोटी ते 93.71 कोटी रुपये या कंपन्यांकडून उभारले जातील. बीएसई एसएमई व एनएसई एसएमई यावर कंपन्यांचे समभाग सुचीबद्ध होतील.

Advertisement

19 आयपीओ होणार सुचीबद्ध

याच दरम्यान या आठवड्यात 19 कंपन्या सुचीबद्ध होणार असून यात एचडीबी फायनान्शियल, कल्पतरु व इल्लेनबेरी इंडस्ट्रीयल गॅसेस यांचा समावेश असेल. एसएमई गटात नीतू योशी लिमीटेड, अॅड कैंटी मीडिया, इंडोगल्फ क्रॉप सायन्सेस, वॅलेन्सीया इंडिया, एस. अल्फा टेक व मुव्हींग मीडिया एंटरटेन्मेंट या कंपन्या सुचीबद्ध होतील.

Advertisement
Tags :

.