For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Hatkanangale Crime | सेंटर लॉक उचकटलं, सीसीटीव्हीचा डीव्हीआरही नेला; सनदी ज्वेलर्समधील 'त्या' मोठ्या चोरीचा सस्पेन्स

05:45 PM May 08, 2026 IST | NEETA POTDAR
hatkanangale crime   सेंटर लॉक उचकटलं  सीसीटीव्हीचा डीव्हीआरही नेला  सनदी ज्वेलर्समधील  त्या  मोठ्या चोरीचा सस्पेन्स
Advertisement

                                       हातकणंगलेत पहाटे धाडसी चोरी;

Advertisement

हातकणंगले - हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी व तारदाळ येथे शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून धाडसी चोरी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. खोतवाडी मुख्य चौकात तारदाळ रोडलगत असलेल्या लालसाब सनदी यांच्या सनदी ज्वेलर्सचे शटरचे सेंटर लॉक उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील अंदाजे सात किलो चांदीचे दागिने व सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला. चोरी केल्यानंतर तारदाळ रोडलगत शिंदे मळ्यानजीक बंद कारखान्यासमोर दागिन्यांचे रिकामे बॉक्स टाकून चोरटे पसार झाले.

दुसऱ्या घटनेत तारदाळमधील जावईवाडी येथे मेन रोडवरील श्रावण खांडेकर यांच्या कोल्ड्रिंक दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी अंदाजे 2 हजार रुपये रोख व कोल्ड्रिंक्स, केक आदी साहित्य लंपास केले. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. डीवायएसपी विक्रमसिंह गायकवाड, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लालसाब सनदी यांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी याच ज्वेलर्समध्ये किरकोळ चोरी झाली होती. मात्र त्यावेळी गुन्हा दाखल न झाल्याने आज पुन्हा मोठी चोरी झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. मेन रोडवरील दुकानांमध्ये सलग चोऱ्या झाल्याने शहापूर पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.