महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

या आठवड्यात 7 आयपीओ होणार सुचीबद्ध

06:27 AM Dec 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुरक्षा डायग्नॉस्टिक, गणेश इन्फ्रावर्ल्ड यांच्यासह इतरांचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

सोमवारपासून सुरु झालेल्या शेअर बाजाराच्या सत्रामध्ये एसएमइ प्लॅटफॉर्मवर 7  कंपन्यांचे आयपीओ सुचीबद्ध होणार आहेत. सुरक्षा डायग्नॉस्टिक यांच्या आयपीओ सोबत गणेश इन्फ्रावर्ल्ड, अग्रवाल टफंड ग्लास इंडिया, आभा पॉवर अँड स्टील, अपेक्स इकोटेक, राजपुताना बायोडिझेल, राजेश पॉवर सर्विसेस, सी टू सी अॅडव्हान्स सिस्टिम्स या कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात दाखल होणार आहेत. बीएसईकडून उपलब्ध माहितीनुसार यावर्षी जवळपास 136 कंपन्यांचे आयपीओ बाजारात लॉन्च झाले आहेत. सुरक्षा डायग्नॉस्टिक यांचा आयपीओ 6 डिसेंबरला एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध होणार आहे. 29 नोव्हेंबरला हा आयपीओ सबक्रीप्शनसाठी खुला झाला असून 3 डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी बंद होणार आहे.

एमरल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स यांचा आयपीओ 5 डिसेंबरला गुंतवणूकीसाठी खुला होणार असून 9 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. कंपनीचे समभाग 12 डिसेंबर रोजी एनएसई एसएमईवरती सूचीबद्ध होणार आहे. निसस फायनान्स सर्व्हिसेस यांचा आयपीओ 4 डिसेंबरला खुला होणार असून 6 रोजी बंद होणार आहे. आयपीओ 11 डिसेंबर रोजी सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच प्रॉपर्टी शेअर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट यांचा आयपीओ सोमवारी खुला झाला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article