7 आयपीओ होणार खुले, टीपको इंजिनियरिंगसह इतरांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
23 मार्चपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात शेअरबाजारात 7 नवे आयपीओ खुले होणार आहेत. यात 3 मेन बोर्डवर असतील. यामध्ये टीपको इंजिनियरिंग, साई पॅरेंटल यांचाही आयपीओ असणार आहे.
टीपको इंजिनियरिंग- टीपको इंजिनियरिंग कंपनीने आपला आयपीओ 23 मार्च रोजी खुला केला असून यात 25मार्चपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी इशु किंमत 84-89 रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आली आहे. कंपनी बीएसई एसएमई वर 1 एप्रिलवर सुचीबद्ध होऊ शकते.
साई पॅरेंटल- साई पॅरेंटल यांचा आयपीओ मेनबोर्डवर 24 मार्चवर खुला होणार असून 27 मार्चपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. इशु किमत 372-392 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 38 समभागांचा समावेश असणार आहे. एनएसई व बीएसईवर कंपनीचे समभाग 2एप्रिल रोजी सुचीबद्ध होऊ शकतात. 408 कोटी रुपयांची उभारणी कंपनी करणार आहे.
आमीरचंद जगदीश कुमार- आमीरचंद जगदीश कुमार यांचा आयपीओ 440 कोटी रुपयांचा असणार असून 24 मार्च रोजी आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. यात 27 मार्चपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. 201-212 रुपये अशी समभागाची किमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 70 समभागांचा समावेश असेल. बीएसई, एनएसईवर समभाग 2 एप्रिल रोजी सुचीबद्ध होण्याची शक्यता आहे. पॉवरीका- पॉवरीका यांचा आयपीओ 24 मार्च रोजी खुला होऊन 27 मार्च रोजी बंद होणार आहे. 110 कोटी रुपये कंपनी आयपीओतून उभारणार आहे. इशु किमत 375-395 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 37 समभाग असतील, ज्यासाठी गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. 2 एप्रिल रोजी कंपनीचे समभाग सुचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
याशिवाय हायनेस मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स आयपीओतून 21 कोटी रुपये उभारणार असून 24 मार्च रोजी खुला होणारा आयपीओ 27 मार्चला बंद होईल. 114 ते 120 रुपये इतकी प्रति समभागाची किमत असेल. 2 एप्रिलला समभाग सुचीबद्ध होतील. विविड इलेक्ट्रोमेक यांचा आयपीओ 130 कोटी रुपयांचा असून 25 मार्च रोजी इशु गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. 528-555 रुपये प्रतिसमभाग किमत असेल. 6 एप्रिलला समभाग बाजारात सुचीबद्ध होईल. इमीयॅक टेक्नॉलॉजीस यांचा आयपीओ 27 मार्चला खुला होत आहे.