कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावच्या 7 फुटबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

10:26 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मध्यप्रदेशमधील उंबराय येथे होणाऱ्या एसजीएफआय 14 वर्षाखालील वयोगटाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावातील सेंट पॉल्सचा संघ कर्नाटक संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मध्यप्रदेशला रवाना झाला. या संघात बेळगावच्या सात खेळाडूंचा समावेश आहे. नुकत्याच बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव विभागीय संघाने विजेतेपद पटकाविले होते. या संघातील सात खेळाडूंनी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक संघात स्थान मिळविले आहे. या संघात आराध्य नाकाडी, नेविन पत्की, प्रणव पिल्ले, अथर्व होनगेकर, महमद रिहान, महमदगौस खानापूर व प्रतिक पाटील, भरतेश या खेळाडूंचा समावेश आहे. हा संघ बेंगळूरमार्गे मध्यप्रदेशला  रवाना झाला. या संघाबरोबर प्रशिक्षण श्रवण उचगावकर आहेत. सेंटपॉल्सच्या या फुटबॉलपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article