For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

7 कंपन्यांच्या मूल्यात 1 लाख कोटींची वाढ

06:12 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
7 कंपन्यांच्या मूल्यात 1 लाख कोटींची वाढ
Advertisement

रिलायन्सच्या मूल्यात सर्वाधिक वाढ : सेन्सेक्स 720 अंकांनी होता तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 1 लाख 23 हजार 724 कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या बाजार भांडवल मूल्यात सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली.  मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 720 अंकांनी वाढलेला होता. यामध्ये एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टूब्रो आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवल मूल्यात वाढ झालेली दिसून आली तर दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, इन्फोसिस, बजाज फायनान्स यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मात्र घसरण अनुभवायला मिळाली.

Advertisement

 यांच्या मूल्यात झाली वाढ

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 45 हजार 266 कोटींनी वाढत 21 लाख 54 हजार 978 कोटी रुपयांवर तर स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 30,414 कोटी रुपयांनी वाढत 9,22,461 कोटी रुपयांवर पोहोचले. लार्सन टुब्रोचे बाजारमूल्य 16,204 कोटींनी वाढत 5 लाख 72 हजार 640 कोटींवर व हिंदुस्थान युनिलिव्हरचे 14626 कोटी रुपयांनी वाढत बाजार भांडवल 5 लाख 51 हजार 637 कोटी रुपयांवर पोहोचले. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 13,538 कोटी रुपयांनी वाढत 15 लाख 40 हजार 3003 कोटी रुपयांवर तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 3103 कोटी रुपयांनी वाढत 9 लाख 68 हजार 773 कोटींवर आले होते.

यांच्या बाजारमूल्यात घसरण

दुसरीकडे आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 10,745 कोटी रुपयांनी कमी होत 11 लाख 75 हजार 914 कोटी रुपयांवर आणि इन्फोसिसचे बाजारमूल्य 6183 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 81 हजार 635 कोटी रुपयांवर स्थिरावले. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 5693 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 16 हजार 430 कोटी रुपयांवर स्थिरावले.

Advertisement
Tags :

.