महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नई विमानतळावर 7.58 कोटींचे सोने जप्त

01:05 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्ली विमानतळावर 11 कोटींचे कोकेन जप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

चेन्नई विमानतळावर कस्टम विभागाने 10 प्रवाशांकडून 12 किलो सोने जप्त केले. दुबई आणि अबुधाबीहून येणाऱ्या प्रवाशांनी आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये तब्बल 7.58 कोटी रुपयांचे सोने लपविल्याचे प्रकरण उघड झाल्याचे कस्टम्स अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांची अधिक चौकशी सुरू आहे. देशातील अन्य एका कारवाईत दिल्ली विमानतळावरून 11 कोटी ऊपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली विमानतळावर पॅमेरोनियन प्रवाशाकडून सुमारे 11 कोटी ऊपयांचे कोकेन जप्त करण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. सायमन अल्फ्रेड नागोंग नावाचा प्रवासी आदिस अबाबा (इथिओपिया) येथून प्रवास करत दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विमानतळाच्या टर्मिनल 3 मध्ये तपासादरम्यान त्याने पोटात कोकेन असल्याची कबुली दिली. सफदरजंग ऊग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोकेनच्या 73 पॅप्सूल्स काढण्यात आल्या. या गोळ्यांचे एकूण वजन 1.96 किलो होते. याप्रकरणी संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article