जिल्ह्यातील ६,८३६ वाहनांना उच्च सुरक्षा पाटी
१३ हजार वाहनाधारकांची अपॉईटमेंट
कोल्हापूर
वाहनांवर उच्च सुरक्षा पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी प्रतिसाद मिळत आहे.१६ मार्च अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील ६,८३६ वाहनांवर उच्च सुरक्षा पाटील बसवण्यात आली आहे. १२,९४९ वाहनधारक अपॉईटमेंटच्या प्रतीक्षेत आहेत.
शासनाने २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च उच्च सुरक्षा पाटी (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक केले आहे.पण शासनाच्या या आदेशाला कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.नागरिकांतून या एचएसआरपीबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत.तसेच गोवा आणि अन्य राज्यापेक्षा ही पाटी बसवण्याचा दर जास्त असल्याचे बोलले जात आहे.या प्रश्नावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात उच्च सुरक्षा पाटी बसवण्यासाठी सुमारे ४८ हजार वाहनाधारकांनी अर्ज केला आहे. त्यापैकी १२,९४९ वाहनधारक अपॉईटमेंटच्या प्रतीक्षेत आहेत. तर केवळ ६८३६ वाहनांवर उच्च सुरक्षा पाटी बसवण्यात आली आहे. वाहनधारकांतून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
उच्च सुरक्षा पाटी (एचएसआरपी) जिल्ह्यातील स्थिती १६ मार्च पर्यंत
एमएच- ०९ - कोल्हापूर
एकूण अर्ज- ३१,५१५
अपॉईटमेंट- १०,२३८
फिटमेंट-५३६८
एमएच- ५१- इचलकरंजी
एकूण अर्ज- ११,३०४
अपॉईटमेंट- २७७१
फिटमेंट- १४६८
सर्व्हर डाऊन
वाहनांवर उच्च सुरक्षा पाटी ( एचएसआरपी) बसवण्यासाठी मोठया संख्येने ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. यामुळे सर्व्हर डाऊन होत आहे. सतत सर्व्हर डाऊन होत राहिल्यास नंबरप्लेट बसण्यासाठी विलंब लागून वाहनधारकांना दंडाचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. यामुळे नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.