For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अदानी कुटुंबाची अंबुजा सिमेंटमध्ये 6,661 कोटींची गुंतवणूक

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अदानी कुटुंबाची अंबुजा सिमेंटमध्ये 6 661 कोटींची गुंतवणूक
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कुटुंबाने अंबुजा सिमेंटमध्ये 6,661 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, सिमेंट बनवणाऱ्या कंपनीतील त्यांचा हिस्सा 3.6टक्केने वाढून 66.7 टक्के झाला आहे. अंबुजा सिमेंटने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये अदानी कुटुंबाने अंबुजा सिमेंटमध्ये 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अधिग्रहणानंतर, कंपनीच्या प्रवर्तकांनी अंबुजामध्ये आतापर्यंत 11,661 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि व्यवसाय विकासाला चालना मिळेल. अदानीने जून 2022 मध्ये अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट 10.5 अब्ज डॉलर्स मोजून विकत घेतले होते. यायोगे कंपनी सिमेंट उद्योगात अधिक विस्तार करण्याच्या दृष्टीने कार्यरत झाली आहे, हे स्पष्ट होते. अंबुजा सिमेंटचे सीईओ अजय कपूर म्हणाले, ‘अदानी कुटुंबाचा हिस्सा वाढवण्याचा निर्णय जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ही सदरची गुंतवणूक अंबुजाला वेगवान वाढीसाठी भांडवल लवचिकता प्रदान करतो.

Advertisement
Advertisement
Tags :

.