महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धाकधुकीचे 66 तास, निकालाची उत्कंठा

01:49 PM Nov 22, 2024 IST | Radhika Patil
66 hours of fear, anticipation of the outcome
Advertisement

कोल्हापूर / विनोद सावंत :
विधानसभा निवडणूकीसाठी नुकतेच मतदान झाले आहे. गतवेळच्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा टक्केवारी वाढली आहे. हा वाढलेली टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार यावरून तर्कविर्तक लढविले जात आहेत. कोल्हापुरातील दहा मतदार संघातील उद्या, शनिवारी दुपारी 12 पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी मतमोजणी आणि निकालामधील अंतर पाहता उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांचे 66 तास धाकधुकीचे असणार आहेत.

Advertisement

कोल्हापूर जिल्हा हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात जी गोष्ट घडते. त्याचे पुनरावृत्ती राज्यभर होते. याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळेच राज्यातील नेते नव्हे तर देशातील नेत्यांच्या सभा, पक्षाच्या बैठका, प्रचाराचा नारळ कोल्हापुरातूनच फुटतो. याबरोबरच प्रत्येक पक्षाला कोल्हापुरातील सत्ता केंद्रावर आपलीच सत्ता असावी असे वाटते. यामुळेच कोल्हापुरातील सर्वच निवडणूकीत इर्षा, खुन्नस पाहण्यास मिळते. विधानसभेची निवडणूक यास अपवाद नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहाही मतदार संघातील निवडणूका चुरशीच्या असतात. यंदाची निवडणूकही उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्वच पक्षातील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. यामुळेच दहा मतदार संघात उमेदवारी देण्यापासून अर्ज माघारी घेईपर्यंत नाट्यामय घडामोडी घडल्या.

Advertisement

गेल्या तीन वर्षामध्ये शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतरच पहिलीच विधानसभा निवडणूक होत असून प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. विशेष करून कोल्हापुरातील दहा मतदार संघावर सर्वांच्या नजरा आहेत. येथील मतदार संघामध्ये गेले दहा दिवस चुरशीने प्रचार झाला असून आरोप-प्रत्यारोपही पाहण्यास मिळाल्या, यंदा तर विरोधकांच्या कमकुवत बाजू शोधून त्यावर व्हिडीओ व्हायरल करण्याचा नवा फंडाच समोर आला आहे. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रचाराचा तोफा थंडावल्या. तर बुधवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून दहाही मतदार संघामध्ये निकालाची उत्कुंठा शिगेला पोहोचली आहे. शनिवारी (दि.23) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. मतदान आणि मतमोजणी यामध्ये दोन दिवसांचे अंतर आहे. या दरम्यानचे 66 तास उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांसाठी धाकधुकीचा बनले आहेत. मतदानाचा टक्का गतवेळच्या तुलनेत वाढला आहे. वाढलेला टक्का आपल्याच उमेदवाराला फायदेशीर ठरणार असे दावेही केले जात आहेत. प्रत्येक मतदार संघात वाढलेल्या टक्केवारीवरून आकडेमोडीची चर्चाही रंगली आहे. तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी याचा आधार घेत पैजाही लावल्या आहेत.

उमेदवारांसह नेत्यांची झोप उडाली
विधानसभेच्या गत निवडणूकीत 72 टक्के मतदान झाले होते. हे मतदान 2014 ते 2019 दरम्यान नोंद असणाऱ्रे आहेत गेल्या पाच वर्षात 72 हजार नवमतदार झाले आहेत. त्यांच्याकडून मतदानावेळी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. याचबरोबर गत निवडणूकीत ज्यांनी मतदान केले नव्हते. त्यांनीही यावेळी मतदान केले आहे. यामुळेच गतवेळच्या तुलनेत 4 टक्के मतदान वाढले असून 76 टक्के मतदान झाले आहे. प्रत्येक मतदार संघात सुमारे 15 हजार ते 30 हजार मतदान वाढले आहे. वाढलेल्या मतावरूनही तर्कविर्तक लावले जात असून उमेदवारांसह नेत्यांची झोप उडाली आहे.

अपक्ष, नोटाकडेही नजरा
दहा मतदार संघात 121 उमेदवार रिंगणात आहेत. काही मतदार संघात 15 हून अधिक उमेदवार आहेत. यामध्ये पाच ठिकाणी तिरंगी तर पाच ठिकाणी दुरंगी लढत आहे. याचबरोबर प्रत्येक मतदार संघात अपक्षही उमेदवार आहेत. नोटाचाही टक्का गेल्या दोन निवडणूकीत वाढला आहे. याचा फटका नेमका कोणाला बसणार.तिरंगी मतदार संघात नेमका कोण कोणाची मते खाणार, कोणाचा पत्ता कट होणार याबाबतही रात्री उशीरापर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत.

25 लाख मतदारांचा कौल कोणाला
जिल्ह्यातील दहा मतदार संघात तब्बल 33 लाख 5 हजार 98 मतदार आहेत. यापैकी 76 टक्के मतदारांनी मतदान केले आहे म्हणजेच सुमारे 25 लाख 8 हजार मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे. या मतदारांचा कौल कोणाला असणार हे शनिवारीच स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article