कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाहतूक नियम मोडणे ६, १५२ जणांना पडले महागात

05:06 PM Jun 05, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणे यंदा वाहनधारकांना चांगलेच महागात पडले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ६,१५२ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून एकूण २ कोटी ६० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात विनार्हेल्मेट १.७५१, ओव्हरस्पीड असलेले, १,१७३ मुदत संपलेले ९०० वाहनधारक कारवाईत सर्वाधिक लक्ष्य झाले.

Advertisement

जनजागृती करूनही वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांवर अंकुश टैवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहनचालविण्याचा परवाना जवळ नसणे, नंबरप्लेट नसणे, मोबाईलवर संभाषण करत वाहने चालवणे, मुदतबाह्य वाहने, पीयुसी नसणे, विना हेल्मेट आदी नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. सन २०२४-२५ मध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवाईत अनेक वाहनधारकांकडून पेड अर्थात जागीच दंड वसूल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने राष्ट्रीय, राज्य, अंतर्गत जिल्हा मार्गावर वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणाऱ्या वाहनांवर वर्षभरात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ कोटी ६० लाख ७३ हजार रु.चा दंड व ७७ लाख ३६ हजार वाहतूक कर वसूल करण्यात आला आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन येथील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

-मालवाहू ट्रक, टिप्पर, ट्रेलरकडून सर्वाधिक दंड वसुली

- ओव्हरलोड वाहतूक ३९५ ट्रकना १ कोटी ११ लाख रु.चा दंड

- मुदत संपलेल्या ९०० वाहनांवर कारवाईचा बडगा

- अवैध प्रवासी वाहतूक व नियम भंग करणाऱ्या ३१७ प्रवासी बस, रिक्षाचालक यांना ३० लाखाचा दंड करण्यात आला

- विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ४९ स्कूल बसही कारवाईच्या कचाट्यात

- विनाहॅल्मेट वाहन चालविणारे १,७५१ वाहनचालकांवर कारवाई

-विना सीटबेल्ट १८६ वाहने, ओव्हरस्पीड १,१७३ वाहनधाकांना दंड

-ट्रिपल सीट १९७ वाहने, गाडी चालवताना मोबाईलचा वापर ३६८ चालक

- विना विमा प्रमाणपत्र ८७२, लायसन नसणारे ३२६ जणांचा समावेश

-परवानगीशिवाय वाहनांमध्ये बदल २० वाहनांवर

-कारवाई रिफ्लेक्टरशिवाय ५०० वाहने, मुदतबाह्य वाहने ९०० जणांचा समावेश

-पियुसी नसताना वाहन चालविणे ७३२ यांच्यावर कारवाई

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article