महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोदींकडून वाराणसीला 6,100 कोटींची भेट

06:52 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विमानतळांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण : रुग्णालय, विमानतळ यासारख्या सुविधांचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपला संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये 6,100 कोटी ऊपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्ये 90 कोटी ऊपये खर्चून बांधलेल्या आरजे शंकर नेत्र ऊग्णालयाच्या उद्घाटनाचाही समावेश आहे. वाराणसीच्या आपल्या एक दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी 2,870 कोटी ऊपये खर्चून बांधलेल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची आणि इतर कामांची पायाभरणीही केली.

प्रकल्प लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी एका मेळाव्याला संबोधित केले.  यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. आरजे शंकर नेत्र ऊग्णालय वाराणसी आणि या भागातील अनेक लोकांच्या जीवनातील अंधार दूर करेल, त्यांना प्रकाशाकडे घेऊन जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. हे ऊग्णालय वृद्धांची सेवा करेल आणि लहान मुलांनाही प्रकाश देईल. या ऊग्णालयामुळे येथील तऊणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. हे हॉस्पिटल 90 कोटी ऊपये खर्चून पूर्ण झाले आहे. तसेच या जागतिक दर्जाच्या नेत्रसेवा सुविधा पुरविण्यासाठी 110 कोटी ऊपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

काशीला प्राचीन काळापासून धर्म आणि संस्कृतीची राजधानी म्हणून ओळखले जाते. आता काशी हे पूर्वांचल आणि उत्तर प्रदेशचे मोठे आरोग्य केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होत आहे. काशी प्राचीन काळापासून धर्म आणि संस्कृतीसाठी ओळखले जायचे. काशी ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असली तरी गेल्या 10 वर्षांत येथे आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

शंकराचार्यांचीही भेट

ऊग्णालयाच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी कांची मठाच्या शंकराचार्यांचीही भेट घेतली. त्यांनी एका प्रदर्शनाला भेट दिली. याप्रसंगी या पवित्र महिन्यात काशीला येणे ही एक पुण्यपूर्ण अनुभवाची संधी आहे. येथे केवळ काशीतील लोकच उपस्थित नाहीत, तर आम्ही संत आणि परोपकारी लोकांच्या सहवासात आहोत. यापेक्षा आनंददायी योगायोग काय असू शकतो. येथे आज मला परमपूज्य शंकराचार्यजींचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, असे पंतप्रधान म्हणाले.

23 प्रकल्पांना चालना

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी 1 वाजता वाराणसीला दाखल झाले. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 6,100 कोटी ऊपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, क्रीडा, धर्म, पर्यटन, रोजगार, गृहनिर्माण, विमान वाहतूक अशा अनेक सुविधा जनतेला समर्पित करण्यात आल्या. वाराणसी विमानतळाचा विस्तार आणि नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article