महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी राष्ट्रीय लोकअदालतीत ६१ प्रकरणे तडजोडीने निकाली

05:53 PM Sep 28, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व सावंतवाडी तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सावंतवाडी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी ६१ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली . त्यातून १५ लाख ८५ हजार २०९ एवढी रक्कम वसूल करण्यात आली . या लोक अदालतीत १७२६ एकूण प्रकरणे ठेवण्यात आली होती . लोक अदालतीचे उदघाटन दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्रीम . जे .एम .मिस्त्री यांच्या हस्ते झाले . यावेळी पॅनेलचे सदस्य म्हणून ऍड . अनिल केसरकर तसेच न्यायालयाचे सर्व कर्मचारी , वकील वर्ग , पोलीस , उपस्थित होते .

Advertisement

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update # konkan update # lok adalat
Next Article