For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉकी इंडियाच्या शिबिरासाठी 60 महिला खेळाडूंची निवड

06:25 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
हॉकी इंडियाच्या शिबिरासाठी 60 महिला खेळाडूंची निवड
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

हॉकी इंडियाच्या सोमवारपासून सुरू झालेल्या सात दिवसांच्या शिबिरासाठी 60 जणांची निवड करण्यात आली असून त्यात अनेक नवीन चेहऱ्यांसह गोलरक्षक सविता पुनिया आणि आघाडीपटू वंदना कटारिया यासारख्या दिग्गजांचाही समावेश आहे. या शिबिराच्या शेवटी चाचण्या घेऊन त्यातून 33 संभाव्य खेळाडूंचा राष्ट्रीय संघ निवडला जाईल.

सदर मूल्यमापन शिबिर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात आयोजित केले आहे आणि 6 व 7 एप्रिल रोजी त्यात निवड चाचण्या होतील. त्यातून भविष्यातील सराव शिबिरे आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी 33 संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात येईल. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या 14 व्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन खेळाडूंना निवडण्यात आले आहे, असे हॉकी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

या वर्षाच्या सुऊवातीला पात्रता स्पर्धेचे यजमान असूनही पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात महिला संघाला अपयश आल्यानंतर हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. या शिबिरासाठी निवडलेल्या खेळाडूंवर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षिका अंकिता बी. एस. यांची देखरेख राहील. नेदरलँड्सच्या जेनेके शॉपमनने सन्मानाचा अभाव आणि प्रतिकूल कामाच्या वातावरणाचे कारण देत पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही भूमिका अंकिताकडे सोपवण्यात आली आहे.

या खेळाडूंमध्ये गोलरक्षक सविता, सोनल मिंज, बिचूदेवी खरिबम, माधुरी किंडो, बन्सरी सोळंकी, प्रमिला के. आर. आणि रम्या कुर्मपू यांचा समावेश आहे. सविता आणि बिचू वगळता इतर सर्व नवीन खेळाडू आहेत आणि त्यापैकी उत्तर प्रदेशच्या बन्सरी सोळंकीकडे एक आशादायक प्रतिभा म्हणून पाहिले जाते. या 22 वर्षीय तऊणीने कनिष्ठ स्तरावर चांगली कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेतही राज्यातर्फे खेळताना तिने चांगली कामगिरी केली.

उदिता, निक्की प्रधान, रोपनी कुमारी, लालहुनमावी, प्रीती, टी. सुमन देवी, अंजना डुंगडुंग आणि निशी यादव या बचावपटूही शिबिरात सहभागी झालेल्या आहेत. मात्र ज्या नावांना निवडण्यात आलेले नाही त्यामध्ये गुरजित कौर असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या संघाचा ती भाग होती. शिबिरासाठी निवडलेल्या बहुतेक मिडफिल्डर्सना राष्ट्रीय संघातून खेळण्याचा अनुभव आहे आणि महाराष्ट्राच्या भावना खाडे तसेच बंगालच्या मॅक्झिमा टोप्पो या नवीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळें निवड झाली आहे.

Advertisement
Tags :

.