जिल्ह्यात 60 हजार 580 मतदार वाढले; एकूण मतदार संख्या झाली 31 लाख 51 हजार
52 हजार मतदार मयत; विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादीतील चित्र; आज जिह्यातील 3359 मतदान केंद्रांवर होणार यादी प्रसिध्द
कोल्हापूर प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिह्यात 27 ऑक्टोंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत मतदार नोंदणी, दुबार व मयत मतदार वगळणीचे अर्ज भऊन घेण्यात आले. यानंतर आज, मंगळवारी अंतिम मतदार यादी जिह्यातील 3359 मतदान केंद्रांवर प्रसिध्द करण्यात येत आहे. यात जिह्यात 60 हजार 580 मतदार वाढले असून 52 हजार 832 मतदार मयत आढळले आहेत. जिह्याची अंतिम मतदारसंख्या सुमारे 31 लाख 51 हजार 58 इतकी झाली आहे.
जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यमातून विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गा 27 ऑक्टोबरला प्राऊप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. यानंतर दावे व हरकतींसाठी मुदत ही देण्यात आली होती. या कालावधित नाव नोंदणी, नाव दुऊस्ती, दुबार नाव व मयत नावे वगळणीचे अर्ज दाखल झाले होते. हे सर्व अर्ज निकाली काढून आज, मंगळवारी जिह्याची अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. यामध्ये जिह्यात 31 लाख 42 हजार 98 इतकी मतदारसंख्या नोंद झाली आहे. यात पुऊष मतदार 16 लाख 1 हजार 807, महिला मतदार 15 लाख 40 हजार 522 व तृतीयपंथी 169 मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये 60 हजार 580 इतके मतदार वाढले असून यात 18 ते 19 वयोगटातील 35 हजार 162 मतदारांचा समावेश आहे. याबरोबरच 8 हजार 960 सैनिक मतदारांचीही अधिक नोंद झाली आहे.
ही अंतिम मतदार यादी आज, मंगळवारी जिल्हा निवडणूक विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व प्रांताधिकारी कार्यालये, तहसीलदार कार्यालयांसह जिह्यातील 3359 मतदान केंद्रांवर एकाचवेळी प्रसिध्द करण्यात येणार आहे. यानंतरही लोकसभा निवडणुकीपर्यंत पुरवणी मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुऊ राहणार आहे.