For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा भागात 60 टक्के मतदान

10:16 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा भागात 60 टक्के मतदान
Advertisement

आंबेवाडीत चुरशीने 87 टक्के मतदान

Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील मतदान मंगळवार दि. 7 रोजी पार पडले.. यावर्षी उष्णतेत वाढ झाल्याने मतदारांत निऊत्साह दिसून येत होता. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असून हिंडलगा भागात सर्वसाधारण 60 टक्के मतदान झाले आहे. तेच आंबेवाडीत मात्र चुरशीने मतदान संध्याकाळी सहापर्यंत झाले असून जवळजवळ चारही केंद्रांतून 89टक्के मतदान झाले आहे. मतदान केंद्रावर मतदारांसाठी बसण्याची सोय म्हणून कांही ठिकाणी शामियाना घालण्यात आला होता. हिंडलगा, विजयनगर, लक्ष्मीनगर या भागात शामियान्याची सोय केली होती.आंबेवाडीत मात्र शामियाना घालण्यात आला नव्हता. काही केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय सामाजिक संघटनांनी केली होती. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती व आरोग्य विषयक त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी खास करून प्राथमिक आरोग्य केंद्र बेळगुंदी यांच्यामार्फत परिचारिकेची सोय करण्यात आली होती. हिंडलगा या ठिकाणी स्मिता एम. एन. यांनी मतदारांना तशी सेवा दिली. यांच्यासमवेत आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या व बी. एल. ओ. उपस्थित होत्या.

Advertisement

सकाळच्या सत्रात चुरशीने, दुपारी संथगतीने मतदान

सकाळच्या सत्रात मतदान थोडेसे चुरशीने झाले. दुपारनंतर मतदानावर शिथिलता आली. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला नाही. शासनामार्फत मोठ्या प्रमाणात जागृती केली होती. परंतु मतदान टक्का वाढला नाही. अतिशय उष्णतेमुळे व मतदारांच्या निऊत्साहामुळे मतदानात घट दिसून आली. सर्वसाधारण सुशिक्षित मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. व्हीलचेअरची सोय केल्यामुळे वृद्ध, दिव्यांगांना मतदान करण्यास सुलभ झाले.

Advertisement
Tags :

.