39 गावांच्या पाणी योजनेसाठी 60 कोटींचा निधी
माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश : नऊ तालुक्यातील गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 39 गावांचा जलजीवन मिशन आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला. या गावांमधील पाणी योजनेसाठी 60 कोटींच्या निधीला गुरुवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासंदर्भात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
जलजीवन मिशन आराखड्यामध्ये जिल्ह्यातील काही गावांचा समावेश नव्हता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरखड्यामध्ये जिल्ह्यातील 9 तालुक्यांमधील 39 गावांचा समावेश करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याबाबत माजी आमदार महाडिक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर राधानगरी, शिरोळ आणि आजरा तालुक्यातील प्रत्येकी 1, भुदरगड 5, चंदगड 3, हातकणंगले 4, करवीर 4, कागल 8, पन्हाळा 7 आणि शिरोळ तालुक्यातील 3 अशा एकूण 39 गावांचा समावेश जलजीवनच्या आराखड्यात करण्यात आला. यासाठी 60 कोटींच्या निधीची प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न निकाली निघाला असुन लवकरच स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.