For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुलाचा स्लॅब कोसळून 6 कामगारांचा मृत्यू

06:41 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुलाचा स्लॅब कोसळून 6 कामगारांचा मृत्यू
Advertisement

उत्तर प्रदेशात वादळ-पावसामुळे दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ हमीरपूर

उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे बेटवा नदीवरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा स्लॅब शुक्रवारी पहाटे 2 वाजता कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन कामगारांना वाचवले. बचावकार्य साडेसात तास चालले. या दुर्घटनेनंतर साहाय्यक अभियंता गजेंद्र कुमार चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. वादळ आणि पावसामुळे स्लॅब कोसळताच त्याखाली झोपलेले कामगार गाडले गेले, असे उत्तर प्रदेश ब्रिज कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक धर्मवीर सिंग यांनी सांगितले हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री उशिरा हमीरपूरमध्ये 70-80 किमी प्रतितास वेगाने वादळ आले होते. हा अपघात शहरापासून 25 किमी अंतरावर असलेल्या लालपुरा परिसरात घडला.

Advertisement

Advertisement
Tags :

.