For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंदमानजवळ 6 हजार किलो ड्रग्ज जप्त

06:21 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंदमानजवळ 6 हजार किलो ड्रग्ज जप्त
Advertisement

म्यानमारच्या बोटीवर तटरक्षक दलाकडून सर्वात मोठी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) एका महत्त्वपूर्ण कारवाईत अंदमानच्या समुद्रात एका मासेमारी करणाऱ्या बोटीतून सुमारे 6 टन म्हणजेच तब्बल 6 हजार किलो ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ही भारतीय तटरक्षक दलाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत कोट्यावधी ऊपये आहे. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून अधिक चौकशीसाठी त्यांना अंदमान-निकोबार पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

Advertisement

पोर्ट ब्लेअरपासून 150 किमी दूर असलेल्या बॅरेन आयलँडजवळ एका बोटीमध्ये प्रत्येकी 2 किलो वजनाची 3 हजार पाकिटे सापडली आहेत. या बोटीत म्यानमारचे 6 नागरिक होते. सर्वांना ताब्यात घेण्यात आल्याचे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 24 नोव्हेंबर रोजी तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाच्या नियमित गस्तीदरम्यान पायलटला ही बोट दिसली. ड्रग्जची तस्करी होत असल्याचा संशय आल्याने पायलटने बोटीजवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने बोटीचा वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. वैमानिकाने तातडीने यासंबंधीची माहिती पोर्ट ब्लेअर पोलिसांना दिली. काही वेळाने पोलीस आणि तटरक्षक दलाने मिळून बोट पकडली. बोटीची झडती घेतली असता त्यात कोट्यावधी ऊपयांचे ड्रग्ज सापडले. या अमली पदार्थांची भारतात तस्करी केली जाणार होती. भारतीय तटरक्षक दलाने अंदमानच्या समुद्रात एका मासेमारीच्या बोटीतून सुमारे सहा टन ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थांची खेप असल्याचे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

संशयास्पद व्यक्तींची चौकशी

सर्व संशयास्पद व्यक्तींची चौकशी, जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ आणि बोट यांच्याशी संबंधित तपशीलांची तपासणी सुरू आहे. हे यश म्हणजे तस्करीच्या रॅकेटमधील मोठा हल्ला मानला जात आहे. अशा कारवाईमुळे सागरी सुरक्षा आणि अमली पदार्थांविऊद्ध भारतीय तटरक्षक दलाची दक्षता आणखी मजबूत करते. या कारवाईनंतर, तटरक्षक दल आणि इतर संबंधित यंत्रणा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्याविऊद्ध अधिक आक्रमक कारवाई करू शकतात, हे सिद्ध झाले आहे.

10 दिवसांपूर्वी 700 कोटींचे ड्रग्ज जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने 15 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावरून 500 किलो ड्रग्ज जप्त केले होते. त्याची किंमत 700 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. दिल्ली एनसीबीला या औषधांची माहिती मिळाली होती. यानंतर दिल्ली एनसीबीने गुजरात एनसीबी, तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने एक बोट पकडल्यानंतर त्यात अमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला होता.

Advertisement
Tags :

.