महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चोरीच्या ६ मोटरसायकल जप्त; एका युवकाला अटक

04:01 PM Dec 20, 2023 IST | Abhijeet Khandekar
stolen motorcycles seized
Advertisement

उमरगा प्रतिनिधी

मोटरसायकल चोरी करणार सराईत गुन्हेगारांना पकडण्यात उमरगा पोलीसांना यश आले असून त्यांच्याकडून ६ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.

Advertisement

याबाबतचे अधिक माहिती अशी की, उमरगा पोलीस स्थानकात दिनांक १७ रोजी असिफ अयुब मुजावर रा मुंशि प्लॉट उमरगा यांच्या मालकीची असणारी एम एच १४ इ के ७८६१ काल्या रंगाची फॅशन प्रो गाडी मोटार सायकल जेकेकुर शिवरातून कोणी तरी अज्ञात इसमाने चोरून घेऊन गेली आहे अश्या मजकुराऊन फिर्याद दाखल झाली होती. सदरची मोटार सायकल शोध कामी उमरगा पोलिस ठाणे ची टीम शोध घेत असताना बायपास रोड उमरगा येथे एक संशीयत इसम स्प्लेंडर गाडी वर संशीयत रित्या फिरताना अढलून आला. त्याचे कडे ताब्यात असलेल्या मोटर सायकलच्या कागदपत्रा बाबत विचारणा केली असता त्याने उडावा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यास चौकशी कामी उमरगा पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन अधिक चौकशी केली असता. त्याने त्याचे नाव प्रकाश लक्ष्मण बाडगुळे वय २३ वर्ष रा ईश्वर नगर बसवकल्याण जिल्हा बीदर असे सांगितले. त्याचे जवळील गाडीचे कागदपत्र बद्दल विचारले असता त्याने गाडीचे कागद पत्र नसल्याचे सांगीतले त्या बद्दल सखोल चौकशी केली असता सदर गाडी ईटकळ परिसरातून चोरी केल्याचे सांगितले आणि आणखीन चौकशी केली असता जेकेकुर परिसरातून चोरी गेलेली गाडी सुद्धा त्यानेच चोरल्याचे सांगितले. तसेच पोस्टे लोहरा, नळदुर्ग, कासारशिरसी हद्दीतून वेगवेगळ्या कंपनीच्या ५ मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले.सदर आरोपी कडून एकूण सहा मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
stolen motorcyclesTarun Bharat Newzyouth was arrested
Next Article