For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीतील बँकेत बनावट नोटा भरल्याप्रकरणी ६ जण ताब्यात

04:17 PM Apr 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीतील बँकेत बनावट नोटा भरल्याप्रकरणी ६ जण ताब्यात
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरातील एका बँकेत भरलेल्या पैशातील २०० रुपयाच्या ८ नोटा या बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँक व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात बनावट नोटांची सिरीज ही सांगली शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जप्त नोटांच्या सिरीजशी मिळतीजुळती असल्याने त्यातील आरोपी सुप्रीत कडप्पा देसाई ( २२)कोल्हापूर ,राहुल राजाराम जाधव (३३)कोल्हापूर ,इब्रार आदम इनामदार ( ४४) कोल्हापूर, नरेंद्र जगन्नाथ शिंदे ( ४०) कोल्हापूर, सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८ ) राह. मालाड मुंबई , संदीप बाळू कांबळे ( ३८ ) रा .कोल्हापूर यांना सांगली कारागृहातून न्यायालयाच्या आदेशाने सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.