6 लाख देऊन आरडाओरड करण्याचा प्रकार
जंगलात होते पार्टी, महिला करतात तोडफोड
क्रोध आणि संताप कुणासाठीच योग्य नाही. यापासून सुटका मिळविण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपाय करत असतात. ध्यानधारणेपासून योगसराव करत मन शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु संताप कमी करण्याचा कुठलाही विधी असू शकतो का? अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये सध्या रेज रिच्युअल्स हा नवा ट्रेंड आहे. यात जंगलात पार्टी आयोजित केले जाते, जेथे संतप्त महिला येतात आणि ओरडून स्वत:च्या संतापाला वाट मोकळी करून देतात. तेथे तोडफोड आणि आरडाओरड करत मन शांत केले जाते. अशा प्रकारच्या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च करावे लागतात.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिया बँडुची यांना मिया मॅजिक या नावाने देखील ओळखले जाते. अमेरिकेत सध्या अशा पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशा पार्ट्या जंगलात आयोजित केल्या जातात, ज्यात महिलांना स्वत:च्या संतापाला वाट मोकळी करून देण्याची संधी मिळते. लोकांना राग येऊ नये, ते आक्रमक होऊ नयेत हे आम्ही सांगू इच्छितो. पुरुषांसाठी रडणे अत्यंत आवश्यक आहे, कारण कुठल्याही स्थितीत पुरुष रडण्याची शक्यता कमी असते. अशाचप्रकारे महिलांना देखील स्वत:च्या संतापाला वाट मोकळी करून देता येणे आवश्यक असल्याचे मिया बँडुचीने सांगितले आहे.
पार्ट्यांमध्ये नेमकं काय घडतं?
अशाप्रकारच्या पार्ट्यांमध्ये लोक काय करतात असा प्रश्न मिया मॅजिकला विचारण्यात आला. या पार्ट्यांमध्ये महिला येतात, शक्य तितका वेळ ओरडून घेतात, संताप व्यक्त करतात, मनात येईल ती वस्तू तोडतात, जमिनीवर काठ्या आपटतात, जेणेकरून स्वत:च्या मनातील आक्रमकता निघून जाईल. एकदा मन शांत झाल्यावर या महिलांना आराम मिळतो. याचमुळे अशा पार्ट्यांची मागणी वाढतेय असे मिया मॅजिकचे सांगणे आहे. बँडुचीने मागील काही वर्षांमध्ये अशाप्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन केले आहे. बँडुचीसमवेत अनेक महिला देखील अशाप्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन करत आहेत.
तोडफोड घडविण्याचा प्रकार
अशा पार्ट्यांकरता रितसर स्थळांची निवड करण्यात येते, तेथे रात्रभर थांबण्यासाठी खाल्याही तयार करण्यात आल्या आहेत. अनेक पार्ट्यांमध्ये सामील होण्यासाठी महिला 7 हजार ते 8 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास 6 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करत आहेत. येथे येणाऱ्या महिलांना चिथावणी दिले जाते. त्यांच्यासोबत कधी अन्याय झाला याची आठवण करून दिली जाते. अशाप्रकारची पार्टी चमत्कारिक असते. येथे महिलांना तुम्ही संताप व्यक्त करताना पाहू शकता. हे केवळ हार्मोनल चेंजेजसाठी असल्याचे अशाच एका पार्टीत सामील किम्बर्ली हेल्मसने सांगितले आहे. लोक जेव्हा स्वत:च्या संतापाला बाहेर पडण्याची अनुमती देतात, तेव्हा त्यांच्या आनंदाची क्षमता वाढत असल्याचे प्रसिद्ध डॉक्टर आर्थर जानोव यांनी सांगितले आहे.