For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीसीएस सीईओंच्या वेतनात 6 टक्के वाढ, वेतन घेतले 28 कोटींचे

06:31 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीसीएस सीईओंच्या वेतनात 6 टक्के वाढ  वेतन घेतले 28 कोटींचे
Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

Advertisement

आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी के क्रीतीवासन यांच्या वेतनात आर्थिक वर्ष 2026 मध्ये 6 टक्के इतकी वृद्धी झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2026 मध्ये त्यांना वेतनापायी 28.1 कोटी रुपये मिळाले आहेत, असे समजते. या आधीच्या मार्च अखेर संपलेल्या मागच्या आर्थिक वर्षात मुख्य कार्यकारी अधिकारी के क्रीतीवासन यांना 26.5 कोटी रुपये वेतन मिळाले होते. कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. के क्रीतीवासन यांनी आपल्या कारकिर्दीची तीन वर्षे पूर्ण केली आहेत. 28 कोटी रुपयांच्या त्यांच्या वेतनामध्ये भत्ते व इतर गोष्टींचा समावेश आहे.

इतरांना किती मिळते वाढ

Advertisement

कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ होत असते. आयटी कंपनी टीसीएसमध्ये कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वार्षिक 4.5 ते 7 टक्के वाढ केली गेली आहे. याच गटातील कर्मचाऱ्यांना जे भारताबाहेर सेवा बजावत आहेत त्यांच्या वेतनामध्ये 1 ते 6 टक्के इतकी वाढ केली गेली आहे. मार्च अखेरपर्यंत कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 5 लाख 84 हजार 519 इतकी होती.

क्रीतीवासन यांच्या कारकिर्दीची तीन वर्षे पूर्ण

वेतनामध्ये भत्ते व इतर गोष्टींचा समावेश

मिशन आणि बहुग्राम पाणीपुरवठा योजनेंतर्गत पूर्ण

Advertisement
Tags :

.