Kolhapur News | वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ६ बकरी ठार ; नागाव ता. हातकणंगले येथील घटना..!
नागाव येथे वन्यप्राण्यांचा हल्ला; सहा कोकरे ठार
पुलाची शिरोली -वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात नागाव ता. हातकणंगले येथील अनिल पुजारी या मेंढपाळाची ६ बकरी ठार. यामध्ये मेंढपाळाचे सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हि घटना मंगळवारी घडली
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागांव येथील मेंढपाळ अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे, सुनील पुजारी यांच्या सुमारे ३५० मेंढरांचा कळप सुनील शिराळे यांच्या शेतात गेली ७ दिवसापासून बसवली आहेत.
मंगळवारी रात्री ६ ते ७ वा. सुमारास कोल्हा/ तरस सदृश्य वन्यप्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर हल्ला केला. या हल्ल्यात ६ मेंढरांची कोकरे जागीच मृत्यूमुखी पडली. शिवाजी राणगे यांनी तातडीने यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे व वन अधिकारी यांना कळविली.
त्यानुसार वनपाल कुलदीप कांबळे व पशुसंवर्धन अधिकारी घटनास्थळी येवून पंचनामा केला. डाॅ. प्रवीण नाईक पशुधन विकास अधिकारी यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केले. यावेळी डॉ.विजय गोरड, अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे, सुनील पुजारी, शिवाजी राणगे, इ. मेंढपाळ उपस्थित होते.