वेंगुर्ला - कुबलवाडा राणी लक्ष्मीबाई शाळेस 6 संगणक प्रदान
राष्ट्रवादी प्रदेश महिला उपाध्यक्ष नम्रता कुबल यांनी शरदचंद्र पवार यांच्या स्वनिधीतुन उपलब्ध केले संगणक
वेंगुर्ले । वार्ताहर
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष नम्रता नितीन कुबल यांनी केलेल्या मागणीनुसार वेंगुर्ले कुबलवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळा या शाळेस विद्यार्थ्यांच्या विकासासाठी दिलेल्या सहा कॉम्प्युटर प्रदान सोहळाआज बुधवारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिमा पेडणेकर यांच्याकडे सुपुर्द करुन झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष सौ नम्रता कुबल, राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा सदस्य नितीन कुबल, वेंगुर्ले शहर प्रभारी अध्यक्ष स्वप्निल रावळ, ज्येष्ठ नागरिक शेखर वेंगुर्लेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयेश मांजरेकर, शिक्षिका मुग्धा कनयाळकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आरती नेरुरकर, माता संघाच्या अध्यक्ष अनुक्षा राजापूरकर, अंगणवाडी सेविका अश्विनी पालव, सागर रेडकर याबरोबरच शाळा व्यवस्थापन समिती मातक माता पालक संघ व शिक्षक पालक संघ याचे सदस्य तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांनी एका ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी संगणकीय युगात संगणक शिक्षणाने टॅलेंट घडावे प्राथमिक शाळेत असताना संगणकाचे ज्ञान त्यांना मिळावे. या दृष्टीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी दिलेल्या या संगणकाचा उपयोग मुलांना घडविण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न करावा या संगणकीय शिक्षणामुळे या शाळेत विद्यार्थी संख्या ही वाढीस लागेल आणि शरद पवार साहेबांना अपेक्षित असलेले मुलांना संगणकातून टॅलेंट घडवण्याचे काम या शाळेतील शिक्षकांनी पूर्ण करावे असे यावेळी स्पष्ट केले.