For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जप्त केलेली 6.73 कोटीची रक्कम पीडितांना परत करणार

07:03 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
जप्त केलेली 6 73 कोटीची रक्कम पीडितांना परत करणार
Advertisement

सायबर विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांची पत्रकार परिषदेत माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

सायबर गुन्हेगारांनी फसवून लुटलेले 3 कोटी 73 लाख रुपये हस्तगत करण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले आहे. यावर्षी 2 कोटी 71 लाख रुपये जप्त केले    असून त्यापूर्वी 3 कोटी 73 लाख रुपये गोठविण्यात आले आहेत. सदर गोठविण्यात आलेली एकूण रक्कम 6 कोटी 73 लाख पीडितांना परत करण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती सायबर गुन्हा विरोधी विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. ही प्रक्रिया आणखी सुलक्ष करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

काल शनिवारी आल्तिनो येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिली. सायबर गुन्हेगारांपासून बचाव करण्यासाठी पोलिसांनी जारी केलल्या 1930 या हेल्पलाईनमुळे लोकांचे एकूण 3 कोटी 73 लाख रुपये वाचविण्यात यश मिळाले आहे. सायबर गुन्हेगारीविरुद्ध सर्व आघाड्यांवर लढा द्यावा लागतो. एका बाजूने सायबर गुन्ह्यांचा तपास करणे आणि अशा गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी जनजागृती करणे. तसेच त्यासाठी लोकांना आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाईन देणे अशी कामे सायबर विभागाकडून केली जातात. 1030 या क्रमांकावर संपर्क करून कुणीही सायबर गुन्ह्यांसंबंधी मदत मागू शकतो. या हेल्पलाईनमुळे लोकांची फार मोठी मदत झाली असल्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.

लोकांच्या झटपट पैसे कमावण्याच्या लोभीवृत्तीचा गैरफायदा सायबर गुन्हेगार  उठवतात. गुंतवणुकीवरील भरमसाट परतावा, न काढलेली लॉटरी जिंकणे आणि कुणी तरी अनोळखी माणसाकडून आपल्याला भेटवस्तू पाठविली जाऊ शकते अशा  गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे लोक बळी पडतात. असे अनेक लोक आपल्या कष्टाने कमावलेले लाखो रुपये गमावल्याच्या घटना समाजात घडल्या आहेत.

अज्ञानामुळे फोफावली सायबर गुन्हेगारी !

सायबर गुन्हेगार तोतयागिरी करण्यात माहीर असतात. अनेकदा पीडिताचा विश्वास मिळविण्यात त्वरित यशस्वी होतात. आपण एखाद्या प्रसिद्ध कंपनीचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी किंवा विश्वासू मित्र असल्याचा बनाव करतात. त्यांच्या बोलण्यावर भूलून लोक पटकन विश्वास ठेवतात. बरेच सामान्य लोक सायबर घोटाळे, सायबर सुरक्षा उपायांचे महत्त्व जाणत नाहीत. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापा ओळखत नाहीत. अज्ञानामुळे असुरक्षित इंटरनेट सर्फिंग केले जाते. त्यावेळी अनोळखी लिंक्स क्लिक करणे, तसेच अज्ञानातून अन्य काही बेजबाबदार कृती होतात. यामध्ये संबंधित लोक आपली गोपनीय माहिती सायबर गुन्हेगारांच्या स्वाधीन करतात, असेही अधीक्षक राहुल  गुप्ता म्हणाले

Advertisement
Tags :

.