बिहारमध्ये छठपूजेवेळी 59 जणांचा बुडून मृत्यू
मृतांमध्ये बहुतांश मुले, 11 बेपत्तांचा शोध सुरू
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये छठ उत्सवादरम्यान नद्या आणि तलावांमध्ये बुडून 59 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या 36 तासांत या घटना घडल्या आहेत. कोसी-सीमांचल आणि पूर्व बिहारमधील विविध जिह्यांमध्ये छठ पूजेदरम्यान बुडून 22 जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय खगरिया येथे सर्वाधिक 4 जण बुडाले. पूर्णिया- मुंगेरसह अनेक जिह्यांमध्ये छठपूजेच्या दिवशी भीषण अपघात घडल्याची नोंद झाली असून अजूनही 11 जण बेपत्ता असल्याचे समजते. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न विविध यंत्रणांकडून सुरू आहेत.
सर्वाधिक मृत्यू बेगुसराय, समस्तीपूर आणि रोहतास येथे झाले असून प्रत्येकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे. भाविकांच्या गर्दीमुळे अनेक अपघात झालेल्या राज्यातील विविध जिह्यातून या दु:खद बातम्या आल्या आहेत. बेगुसराय येथे गुऊवारी तीन तर शुक्रवारी चार जणांचा बुडून मृत्यू झाला. रोहतासमध्ये गुऊवारी चार आणि शुक्रवारी एकाचा बुडून मृत्यू झाला. पाटण्याच्या फुलवारी शरीफमध्ये दोन, मणेर आणि बख्तियारपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. मणेर येथे शुक्रवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी भाऊ-बहिणीसह सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. भोजपूर जिह्यातील सोन नदीत पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत, एक मूल बेपत्ता आहे आणि दोघांना स्थानिक लोकांनी वाचवले आहे.