For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबा-काजू नुकसानीपोटी ५९ कोटींचे वाटप; २६ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

10:13 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंबा काजू नुकसानीपोटी ५९ कोटींचे वाटप  २६ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
Advertisement

सिंधुदुर्गनगरी : ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा व काजू पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेग आला आहे. २४ सप्टेंबर २०२६ अखेर जिल्ह्यातील २६ हजार ६१२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर ५९ कोटी २३ लाख ४५ हजार ९४५ रुपये नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एकूण ७९ कोटी ३४ लाख ५६ हजार ६७७रुपये अपेक्षित निधी निश्चित करण्यात आला असून, ई-पंचनामा पोर्टलवर ३४ हजार ९३३ लाभार्थ्यांसाठी ७६ कोटी ६ लाख ८० हजार १०१.७४ रुपये मंजूर झाले आहेत.

Advertisement

जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संबंधित तहसीलस्तरावरून ई-पंचनामा पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा केली जात आहे.

देवगडला सर्वाधिक निधी
तालुकानिहाय विचार करता देवगड तालुक्यासाठी सर्वाधिक २० कोटी ७७ लाख १ हजार ८१६ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ५ हजार ९८२ लाभार्थ्यांना १४ कोटी २१ लाख ५४ हजार २६ रुपये वितरित झाले आहेत. त्यापाठोपाठ कुडाळ तालुक्यासाठी १२ कोटी २५ लाख ७५ हजार ७२५ रुपये मंजूर असून, त्यापैकी १० कोटी ९२ लाख ७० हजार २७५ रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Advertisement

मालवण तालुक्यात १० कोटी २९ लाख ८१ हजार २८३ रुपयांपैकी ७कोटी ५० लाख १४ हजार ५४८ रुपये, तर सावंतवाडी तालुक्यात मंजूर ९ कोटी ८८ लाख २२ हजार ५१५ रुपयांपैकी ८ कोटी २८ लाख ५४ हजार ४१५ रुपये नुकसानभरपाई वितरित झाली आहे. वेंगुर्ले, कणकवली, दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यांमध्येही नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रिया सुरू असून, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्याटप्याने निधी जमा केला जात आहे.

ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर मिळणार निधी
जिल्ह्यात सध्या २ हजार ७०८ लाभार्थ्यांची ५ कोटी ४३ लाख ३९ हजार ४९१.७४ रुपये रक्कम ई-केवायसी प्रलंबित असल्याने वितरित होणे बाकी आहे. याशिवाय काही लाभार्थ्यांच्या बैंक खाते व आधारशी संबंधित बाबींची पूर्तता आवश्यक आहे.

लाभार्थ्यांनी तलाठी किंवा तहसील कार्यालयातून व्हीके क्रमांक प्राप्त करून जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची नुकसानभरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्याची एकत्रित स्थिती
मंजूर लाभार्थी : ३४,९३३ मंजूर निधी : ७६ कोटी ६ लाख ८० हजार
नुकसान भरपाई मिळालेले लाभार्थी : २६,६१२
वितरित निधी : ५९ कोटी २३ लाख ४५ हजार
ई-केवायसी लाभार्थी : २,७०८ प्रलंबित
प्रलंबित रक्कम: ५ कोटी ४३ लाख ३९ हजार

तालुकानिहाय नुकसान भरपाई तालुकानिहाय मंजूर व वितरित निधी
देवगड-मंजूर : २० कोटी ७७ लाख १ हजार ८१६, वितरित: १४ कोटी २१ लाख ५४ हजार २६, कुडाळ-मंजूर १२ कोटी २५ लाख ७५ हजार ७२५, वितरित: १० कोटी ९२ लाख ७० हजार २७५, मालवण-मंजूर १० कोटी २९ लाख ८१ हजार २८३. वितरित : ७कोटी ५० लाख १४ हजार ५४८, सावंतवाडी-मंजूर ९ कोटी ८८ लाख २२ हजार ५१५, वितरित : ८ कोटी २८ लाख ५४ हजार ४१५, वेंगुर्ले मंजूर ६ कोटी ८७ लाख ६३ हजार ८३५, वितरित : ४ कोटी ७८ लाख ३५ हजार ६०, कणकवली-मंजूर ६ कोटी ५४ लाख ९१ हजार ६५०, वितरित: ५ कोटी ८२ लाख ३३ हजार ७१८. दोडामार्ग- मंजूर : ५ कोटी ६७ लाख ६० हजार ७००, वितरित: ४ कोटी ४० लाख ६३ हजार ६७५, वैभववाडी-मंजूर : ३ कोटी ७५ लाख ८२ हजार ५७६, वितरित: ३ कोटी २९ लाख २० हजार २२६

Advertisement
Tags :

.