For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हिएतनामसोबत 5800 कोटीचा ‘ब्राह्मोस’ करार

07:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हिएतनामसोबत 5800 कोटीचा ‘ब्राह्मोस’ करार
Advertisement

रशियाकडूनही हिरवा कंदील : व्हिएतनामचे अध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम हे पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश भारतासोबत सामरिक आणि सैन्य भागीदारी आणखी वाढविणे आहे. परंतु त्यांच्या या दौऱ्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट सुमारे 5800 कोटी  रुपयांचा ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा प्रस्तावित करार आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ते ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीसोबत आणखी अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्र प्रणाली आणि संरक्षण उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेला पुढे नेऊ शकतात. प्रस्तावित करारात ब्राह्मोसच्या युद्धनौकाविरोधी वर्जनला सामील पेले जाऊ शकते. याच्या माध्यमातून व्हिएतनामला स्वत:ची सागरी सुरक्षा क्षमता वाढविण्यास सहाय्य मिळणार आहे.

Advertisement

भारत-व्हिएतनामची रणनीतिक भागीदारी

तो लोम हे व्हिएतनामचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर सर्वप्रथम चीनच्या दौऱ्यावर गेले होते. तर स्वत:च्या विदेश दौऱ्यातील दुसरा देश म्हणून त्यांनी भारताची निवड केली आहे. 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिएतनामचा दौरा केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध मजबूत होऊ लागले आहेत. तेथूनच दोन्ही देशांदरम्यान व्यापक रणनीतिक भागीदारीची सुरुवात झाली. तो लाम व्यापक रणनीतिक भागीदारीला एक दशक पूर्ण झाल्यानिमित्त भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य व्यापक रणनीतिक भागीदारीचा मुख्य आधार आहे. ही भागीदारी 2009 च्या संरक्षण सहकार्यावर मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग आणि 2015 च्या संरक्षण सहकार्याच्या संयुक्त दृष्टीकोनावर आधारित आहे. जून 2022 मध्ये दोन्ही देशांनी एक ‘जॉइंट व्हिजन स्टेटमेंट ऑन इंडिया-व्हिएतनाम डिफेन्स पार्टनरशिप टुवर्ड 2030’साठी सहमती दर्शविली होती आणि म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्टकरता एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

भारताकडून ब्राह्मोस खरेदी करणारे देश

व्हिएतनामने ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा करार केल्यास तो भारताकडून हे क्षेपणास्त्र मिळविणारा तिसरा आशियाई देश ठरणार आहे. सर्वप्रथम फिलिपाईन्सने भारतासोबत ब्राह्मोस खरेदीचा करार केला होता. तर मागील महिन्यात इंडोनेशियाने भारतासोबत ब्राह्मोस खरेदीसाठी करार केला आहे. दक्षिण आशियाई देश थायलंड देखील ब्राह्मोस क्षेपणास्त्राकरता रुची दाखवत असल्याचे समोर आले आहे.

ब्राह्मोसकरता इच्छुक असलेले देश

  • सौदी अरेबिया
  • संयुक्त अरब अमिरात
  • ओमान
  • इजिप्त

ब्राह्मोस विक्रीवर रशियाची सहमती

  • भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे रशियासोबत मिळून संयुक्त स्वरुपात विकसित केले आहे.
  • रशिया भारताचा विश्वसनीय मित्रदेश आहे, तसेच व्हिएतनामचा देखील जुना सहकारी आहे.
  • व्हिएतनामला अत्याधुनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्र विक्री करण्यास रशियाचा कुठलाच आक्षेप नाही.

व्हिएतनामचे सर्वात शक्तिशाली नेते

  • तो लाम यांना अनेक दशकांनंतरचा व्हिएतनामचा सर्वात शक्तिशाली नेता मानले जात आहे.
  • चालू महिन्यातील निवडणुकीनंतर ते अध्यक्ष झाले असून व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव देखील आहेत.
  • पारंपरिक स्वरुपात व्हिएतनाममध्ये ही दोन्ही महत्त्वाची पदे वेगवेगळ्या लोकांकडे असत होती.
  • व्हिएतनाममधील सत्ता समीकरणात अत्यंत मोठा बदल झाला असून तो लाम सर्वेसर्वा ठरले आहेत.
Advertisement
Tags :

.