महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘व्हिआय’ 5-जी नेटवर्कमध्ये 5,720 कोटी गुंतवणूक करणार

06:12 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एफपीओनंतर सरकारचा हिस्सा कमी होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

व्होडाफोन आयडीया ही दूरसंचार क्षेत्रातील कंपनी 5-जी नेटवर्क सादर करण्यासाठी आगामी 24 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 5720 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अक्षय मुंद्रा यांनी ही माहिती मंगळवारी दिली. 18,000 कोटी रुपये उभारण्यासाठी कंपनीच्या एफपीओच्या एक दिवस आधी ते पत्रकारांशी बोलत होते. देशातील हा सर्वात मोठा एफपीओ आहे.

मुंद्रा म्हणाले की, उभारलेल्या रकमेपैकी 12,750 कोटी रुपये नेटवर्क पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी तसेच उपकरणे खरेदी करण्यासाठी खर्च केले जातील. यामध्ये 4जी साइट सेट करणे, विद्यमान 4 जी साइट्सची क्षमता वाढवणे आणि नवीन 5जी साइट्स सेट करणे यांचा समावेश आहे. कंपनी एफपीओद्वारे उभारलेल्या निधीचा काही भाग स्पेक्ट्रम थकबाकी भरण्यासाठी खर्च करेल. कंपनी 2,175 कोटी रुपयांची थकबाकी भरेल आणि उर्वरित रक्कम  सामान्य कामकाजासाठी वापरली जाईल.

कंपनी पुढील स्पेक्ट्रम लिलावातही सहभागी होईल का, असे मुंद्रा यांना विचारले असता, त्यांनी सूचित केले की कंपनीकडे उपलब्ध असलेले 5जी स्पेक्ट्रम मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. ते म्हणाले, ‘आम्ही आमच्या विक्रेत्यांशी 5जी साठी काही काळ बोलत आहोत. कोणतीही ऑर्डर रकमेवर अवलंबून असते. म्हणून, निधीची व्यवस्था होताच, आम्ही त्वरीत ऑर्डर देण्याचा प्रयत्न करू.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article