महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भोम रस्ता रुंदीकरणासाठी केंद्राकडून 557 कोटी मंजूर

12:55 PM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : गेले कित्येक दिवस गाजत असलेल्या भोम येथे अखेरीस रस्त्याच्या ऊंदीकरणासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी 557 कोटी ऊपये मंजूर केली आहेत. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या ऊंदीकरणाचे काम आता लवकरच सुरू करण्यात येईल. फोंडा ते पणजी महामार्गावरील भोम रस्त्याचे ऊंदीकरणाचे काम गेले कित्येक वर्षे रखडले आहे. रस्त्याच्या या भागाचे बांधकाम स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे प्रलंबित होते. तसेच केंद्र सरकारने या प्रकल्पाला आर्थिक मदत दिली नव्हती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र पाठवून या प्रकल्पास 557 कोटी ऊपये मंजूर केल्याचे कळविले आहे. यामुळे आता हा महत्त्वाकांक्षी मार्ग लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748 वर उभारण्यात येणाऱ्या या महामार्गाचे बांधकाम वेगळ्या पद्धतीच्या यंत्रणेतून उभारले जाणार आहे. यातून खांडेपार ते भोम या दरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल. अर्थात हे बांधकाम पुढे जुने गोवेपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे मधल्या टप्प्यातील अर्थात खोर्ली येथील रस्त्याचे ऊंदीकरणाचे प्रलंबित काम हे त्या अंतर्गत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे पणजी ते फोंडा या महामार्गावरून जाण्यासाठी लागणारी वेळ यानंतर वाचणार आहे. तसेच बेळगाव येथून येणाऱ्या वाहनांसाठी देखील हा मार्ग योग्य ठरणार आहे. सध्या हा मार्ग अऊंद असून त्या परिसरात वारंवार अपघात होत असतात. केवळ नऊ किलोमीटरच्या पट्ट्यात चार ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे. केंद्र सरकारने भरघोसपणे दिलेल्या आर्थिक मदतीमुळे आता या रस्त्याच्या ऊंदीकरणाचे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article