Ratngiri News : रत्नागिरी जिल्ह्यात ५५.७९ टक्के मतदान ; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष
01:38 PM Feb 08, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
चिपळूणमध्ये ईव्हीएम बिघाडानंतरही सर्वाधिक मतदान
Advertisement
रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ५५.७९ टक्के ईतके मतदान झाले. एकूण ६ लाख ५४ हजार ९४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३ लाख ३६ हजार २८५ महिला, ३ लाख १८ हजार ६६२ पुरुष आणि अन्य २ मतदारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे सर्वाधिक ५० मतदान केंद्रांवर ईव्हीएम बिघडल्याचे प्रकार घडलेल्या चिपळूण तालुक्यातच सर्वाधिक ६२.५६ टक्के ईतके मतदान झाले. त्याखालोखाल रत्नागिरी तालुक्यात ५८.५२ टक्के मतदान झाले. मंडणगड तालुक्यात ४८.७९ टक्के, दापोली ५३.८७, खेड ५६.८९, गुहागर ५६.५२, संगमेश्वर ५३.८५, लांजा ५१.१६ तर राजापूर तालुक्यात ४९.८७ टक्के ईतके मतदान झाले. सोमवार ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार असून प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे.
Advertisement
Advertisement