For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा महिन्यांत 54 लाख पर्यटक गोव्यात : पर्यटनमंत्री

12:58 PM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
सहा महिन्यांत 54 लाख पर्यटक गोव्यात   पर्यटनमंत्री
Advertisement

पणजी : गोव्यात देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांच्या संख्येत गेल्या सहा महिन्यात मोठी वाढ झाली आहे. या सहा महिन्यात 54 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. त्यामुळे पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. विधानसभा अधिवेशनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना मंत्री खंवटे म्हणाले, गोवा आता बारमाही पर्यटन केंद्र बनले आहे. चार्टर विमान ऑपरेटर्स अतिरिक्त विमानांसह गोव्यात येत आहेत. हिंटरलँड पर्यटनाला चालना देणे, पर्यटनाच्या विविध स्वरूपांचा विकास करणे आणि पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पर्यटन खात्याने विमान कंपन्या, हॉटेल व्यावसायिक आणि टूर ऑपरेटर  विविध भागधारकांसह एकत्र बसून पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा आणि पॅकेजेस उपलब्ध करून देण्याचे धोरण राबवण्याचे उद्दिष्ट्या आहे. सांजाव आणि चिखलकाला यासारख्या उत्सवांना जागतिक पटलावर ओळख मिळत  असून, दिवसेंदिवस राज्यातील पर्यटनक्षेत्रात सुधारणा होत आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.