महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यंदा 54 आयपीओ, 2023 मध्ये 49 हजार कोटींची उभारणी

06:23 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2022 कॅलेंडर वर्षापेक्षा उभारणी कमीच : लिस्टींगची संख्या राहिली अधिक

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतामध्ये आयपीओ सादरीकरणामध्ये 2023 हे वर्ष चांगले ठरले आहे. 2023 मध्ये आयपीओच्या माध्यमातून 49 हजार 351 कोटी रुपयांची उभारणी करण्यात आली आहे. या आधीच्या म्हणजेच 2022 मधील कॅलेंडर वर्षातील निधी उभारणीचा विचार करता वरील रक्कम ही 17 टक्के कमीच आहे. तर 2021 कॅलेंडर वर्षाच्या तुलनेमध्ये वरील रक्कम 60 टक्के कमीच आहे, असेही अभ्यासाअंती दिसून आले आहे. 2021 कॅलेंडर वर्षात एकूण 1.18 लाख कोटी रुपयांची उभारणी करण्यात आली होती. यावर्षी लिस्टिंगची संख्या अधिक दिसून आली.

2023 मध्ये 57 कंपन्या बाजारात लिस्ट झाल्या होत्या. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये ही संख्या 40 टक्केपेक्षाही अधिक राहिली. खाजगी इक्विटीधारकांनी 2023 मध्ये आयपीओ अंतर्गत 7783 कोटी रुपये उभारले आहेत. यामध्ये मॅनकाइंड फार्मा, कनकॉर्ड बायोटेक, आर आर केबल आणि होनासा कंझ्युमर यासारख्या कंपन्यांचा सहभाग अधिक होता.

या आयपीओला मिळाले सर्वाधिक सबस्क्रीप्शन

2023 मध्ये मोतीसन्स ज्वेलर्स या आयपीओने सर्वाधिक सबक्रीप्शन प्राप्त केले होते. सदरच्या कंपनीला 160 पट सबक्रीप्शन प्राप्त झाले होते. या पाठोपाठ टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ 140 टक्के तेजीसह दमदारपणे लिस्टिंग झाला होता.

 या समभागाचा दमदार परतावा

2023 सालात आयआरइडीए या समभागाने लिस्टिंग झालेल्या कंपन्यांपैकी सर्वाधिक परतावा देण्याचे काम केले होते. या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 230 टक्के इतका परतावा दिला आहे तर दुसरीकडे आयआरएम एनर्जी या समभागाने मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. जवळपास आठ टक्के हा समभाग घसरला आहे.

यंदा 54 कंपन्यांचे आयपीओ

2024 चे नवे वर्ष पाहता गुंतवणूकदार बरेच आशावादी आहेत. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत आहेत, भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असताना शेअर बाजाराकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. यावर्षी आयपीओ सादरीकरणासाठी बाजारातील नियमक सेबीने 24 कंपन्यांना परवानगी दिली आहे. या कंपन्यांकडून नव्या वर्षी 28 हजार 440 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. 30 कंपन्यांना आयपीओ सादर करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळायची आहे. यामध्ये ओला इलेक्ट्रिक, स्विगी, ओयो यांचा समावेश असणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article