कुडाळात 536 ग्रॅम गांजा जप्त
कुडाळ शहरातील एक युवक ताब्यात
कुडाळ -
कुडाळ - एमआयडीसी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. यात कुडाळ शहरातील एका युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील 536 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. कुडाळ - एमआयडीसी येथे गांजा विक्री करण्यासाठी एक युवक गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली.त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने एमआयडीसी परिसरात आज दुपारी सापळा रचला. एक युवक तेथे आला असता पोलिसाना त्याचा संशय आला.पथकाने त्याची झडती घेतली असता,त्याच्याकडे गांजा सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तसेच 536 गांजा जप्त केला. पुढील कार्यवाही कुडाळ पोलीस करीत आहेत.या कारवाईमुळे बेकायदा अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून अंमली पदार्थ विक्रेत्यांचे रॅकेट पुढे येण्याची शक्यता आहे.