केमिस्ट असोसिएशनच्या रक्तदान शिबिरात 51 जणांचे रक्तदान
कणकवली / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ५१ जणांनी रक्तदान केले. केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधत हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष दयानंद उबाळे, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा सचिव संजय सावंत, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संचालक विजय घाडी, मकरंद घळसासी, तालुकाध्यक्ष संजय घाडी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी, कै. विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, स्वप्निल माळी, श्री. लोके, श्री. नारकर, योगेश रेडेकर, प्रशांत बुचडे व इतर उपस्थित होते. यासाठी जिल्हा रक्तपेढीचे सहकार्य लाभले.