वीज सवलतीसाठी 50 हजार कृषी पंपधारक प्रतीक्षेत
कोल्हापूर / विनोद सावंत :
राज्य शासनाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्यासाठी वीज सवलत योजना आणली आहे. यामध्ये साडेसात एचपीच्या (हॉर्सपॉवर) आतील कृषीपंपांचा समावेश आहे. परंतू साडेसात एचपीवरीलही कृषी पंप शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. शासकीय पातळीवर अशा कृषीपंपधारकांनाही वीज सवलत देण्याची विचारधीन असून महावितरणकडून सर्व्हेचे काम सुरू केले आहे. सर्वेनंतर संबंधित कृषीपंपची वीज माफ करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
पिकांना मुबलक आणि वेळेवर पाणी मिळाले तर उत्पादन वाढते. शेतकऱ्यांकडून कृषीपंपाच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. आवकाळी पाऊस, महापूर, वाढलेली खते-बियाणे अशा अनेक कारणांमुळे खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न कमी मिळत आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकऱ्याची वीज बील भरताना दमछाक होते. यामुळेच महायुतीने मागील वर्षी साडेसात एचपीच्या आतील कृषी पंपांना वीज माफीचा निर्णय घेतला. कोल्हापूर, सांगलीमधील सुमारे 3 लाख 78 हजार 725 कृषी पंपधारकांना याचा फायदा झाला. मात्र, साडेसात एचपीच्यावरील कृषी पंपची वीज बील योजनेला पात्र ठरत नाही. त्यांनाही या योजनेत घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
- 3 लाख 78 हजार 725 कृषीपंपांचे वीजबील शून्य
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात साडेसात एचपीच्या आत 3 लाख 78 हजार 725 कृषी पंप आहे. हे सर्वाचे वीज बील माफ केले जाते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 31 हजार 267 कृषी पंपाचा समावेश आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील कृषीपंपची स्थिती
विभाग 7.5 एचपी पेक्षा जास्त असणारे
गडहिंग्लज 7494
इचलकरंजी 678
जयसिंगपूर 4337
कोल्हापूर ग्रामीण- 1 10864
कोल्हापूर ग्रामीण- 2 11523
कोल्हापूर शहर 35198
- सांगली जिल्ह्यातील कृषी पंपची स्थिती
विभाग 7.5 एचपी पेक्षा जास्त असणारे
इस्लामपूर 3376
कवठेमहाकाळ 3806
सांगली ग्रामीण 3899
सांगली शहर 121
विटा 4199
कोल्हापूर-सांगली एकूण 50599
कोल्हापूरात एकूण कृषी पंप -1,66,465
साडेसात एचपीच्या आतील कृषी पंप-1,31,267
साडेसात एचपीच्यावरील कृषी पंप -35,198
-------------------------------------------------------
सांगलीतील एकूण कृषी पंप-2,62,859
साडेसात एचपीच्या आतील कृषी पंप-2,47,458
साडेसात एचपीच्यावरील कृषी पंप-15,404