For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिवला बीचवर स्वच्छता मोहिमेत ५०० किलो कचरा संकलित

चिवला बीचवर स्वच्छता मोहिमेत ५०० किलो कचरा संकलित
Advertisement

मालवण, दि. ११ ऑगस्ट २०२६ : मा. आरोग्य सभापती यांच्या आदेशान्वये मालवण येथील चिवला बीच येथे मंगळवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला.
आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब अध्यक्ष श्री. सहदेव बापारडेकर यांच्या सहभागाने ही मोहीम पार पडली. यावेळी लायन्स क्लबचे सदस्य, मालवण नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Advertisement

चिवला बीच परिसरातील प्लास्टिक, कचरा व इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश दिला.

स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर मालवण या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे चिवला बीच परिसराला स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त झाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.