जर्मनीतून महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योजकांसाठी Good News, Uday Samant यांची मोठी घोषणा
उद्योगमंत्री उदय सामंत हे नुकतेच जर्मनीच्या दौऱ्यावर गेले आहेत.
रत्नागिरी : महाराष्ट्रात जर्मनीतून येणाऱ्या उद्योजकांसाठी राज्याच्या उद्योग विभागामार्फत 500 एकर जागा राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यात जर्मनीतील उद्योजकांना प्रोत्साहन देत येथे नव्या उद्योजकांसाठी द्वार खुले होणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत हे नुकतेच जर्मनीच्या दौऱ्यावर गेले आहेत. तेथे फ्रँकफर्ट येथे महाराष्ट्र बिझनेस डेच्या कार्यक्रमाला सामंत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी तेथील उद्योजकांनी केलेल्या स्वागताबद्दल धन्यवादही दिले. तेथील उद्योजकांशी चर्चा केली. त्यामुळे नव्याने महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांबाबत मंत्री सामंत यांनी स्वागत केले जाईल, असेही सांगितले.
यावेळी एनआरएम पॉलिसीद्वारे महाराष्ट्रातील लोकं परदेशात राहतात, पण त्यांना महाराष्ट्रात येऊन उद्योग करायचा आहे, अशा 100 उद्योजकांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री सामंत यांनी केली. जर्मनीतील अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट अंतर्गत मध्यम प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी 500 एकर जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तेथील लोकांनी पुढाकार घ्यावा, त्यांचे महाराष्ट्रात स्वागत केले जाईल, असेही सांगितले.
मंत्री उदय सामंत हे नुकतेच जर्मनी दौऱ्यावर गेले असता जर्मनीमधील फ्रँकफर्ट विमानतळावर आगमन होताच महाराष्ट्र बिझनेस डेचे आयोजक अजित रानडे व भरत गीते यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेलारसू, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार उपस्थित होते.