कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2024 मध्ये 50 टक्के मतांचे लक्ष्य

06:43 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकारी बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भाजपची राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक शनिवारी संपली आहे. या बैठकीत भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 50 टक्के मते प्राप्त करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. याचबरोबर नवमतदारांना स्वत:शी जोडण्यासाठी पक्ष पूर्ण देशात अभियान राबविणार आहे. नव मतदारांशी जोडून घेण्यासाठी भाजप बूथ स्तरावर कार्यक्रम आयोजित करणार आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवमतदार संपर्क संमेलनाला संबोधित करू शकतात.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बंपर विजय निश्चित करण्याची सूचना केली आहे. 2024 मध्ये विजयाचे अंतर इतके मोठे असावे की विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप उमेदवारासमोर उभे राहण्याचे धाडस करू नये असे शाह यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे.

बैठकीदरम्यान विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’संबंधी कुठलीच चर्चा झालेली नाही. सर्व लोकसभा मतदारसंघांना गांभीर्याने घ्या. उत्तरप्रदेश किंवा कुठलाही बालेकिल्ला देशाच्या अन्य हिस्स्यात पक्षाच्या खराब कामगिरीची भरपाई करू शकतो असा विचार करू नका. कमकुवत मतदारसंघ आमच्या डिक्शनरीत नसल्याचे शाह यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे.

पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा करत बसू नये. प्रत्येक भाजप नेत्याने आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय निश्चित करण्यासाठी कंबर कसावी असे बैठकीत सांगण्यात आले आहे.

राममंदिर सोहळ्यासाठी व्यापक योजना

पक्षाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी एक व्यापक योजना तयार केली आहे. भाजपकडून एक बुकलेट जारी केले जाणार असून यात पक्षाने राम मंदिर उभारणीसाठी किती संघर्ष केला हे नमूद असणार आहे. भाजपने राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांना समर्थन देणे आणि त्यात भाग घेण्याचा संकल्प घेतला आहे. राम मंदिर सोहळाविषयक स्वत:च्या अभियानादरम्यान भाजप विरोधी पक्षांनी राम मंदिर उभारणी रोखण्याचे प्रयत्न कसे केले यावर प्रकाशझोत टाकणार आहे. याचबरोबर भाजपने 1 जानेवारीपासून राम मंदिर सोहळ्यासाठी अभियान हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात भाजप कार्यकर्ते देशभरातील सर्व गावांमध्ये घरोघरी जात लोकांना राममंदिरासाठी दीपप्रज्ज्वलन करण्याचे आवाहन करणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article