For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीएपीएफ कॅन्टीनमध्ये 50 टक्के जीएसटी सूट

06:10 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीएपीएफ कॅन्टीनमध्ये 50 टक्के जीएसटी सूट
Advertisement

केंद्रीय निमलष्करी दलाच्या 11 लाख जवानांना मोठी भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय निमलष्करी दलाच्या 11 लाख जवानांना सीएपीएफ कॅन्टीन म्हणजेच केंद्रीय पोलीस कल्याण भंडारमध्ये (केपीकेबी) उपलब्ध असलेल्या उत्पादनांवर 50 टक्के जीएसटी सूट मिळणार आहे. गृह मंत्रालयाने याबाबतचे निवेदन सोमवारी जारी केले. केंद्रीय पोलीस कल्याण भंडारकडून वस्तूंच्या खरेदीवर 50 टक्के जीएसटी सहाय्य 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. ही मदत अर्थसंकल्पाद्वारे देय असेल, असे अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

कॉन्फेडरेशन ऑफ एक्स-पॅरामिलिटरी फोर्सेस मार्टर्स वेल्फेअर असोसिएशनने या सुविधेसाठी बराच काळ आवाज उठवला होता. यासाठी संघटनेने अनेक केंद्रीय मंत्र्यांना निवेदनही दिले होते. पीएमओशी पत्रव्यवहार करून ही मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी असोसिएशनने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अंतरिम बजेटमध्ये पॅन्टीन उत्पादनांवर 50 टक्के जीएसटी सूट जाहीर करण्याची विनंती केली होती.

Advertisement
Tags :

.