For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परिवहनच्या ताफ्यात नवीन 50 बसेस

06:13 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
परिवहनच्या ताफ्यात नवीन 50 बसेस
Advertisement

आज लोकार्पण सोहळा : मान्यवरांच्या उपस्थितीत बसचालकांचा होणार गौरव

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

परिवहन मंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या 50 नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 18 रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती बसस्थानकात होणार आहे. याबरोबरच बसचालकांचा रौप्यपदक देऊन सुरक्षा चालक म्हणून गौरव केला जाणार आहे.

Advertisement

या कार्यक्रमासाठी परिवहन मंत्री रामलिंगा रे•ाr, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, कर्नाटक विधानसभेचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, कागवाडचे आमदार राजू कागे, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांसह खासदार अनंतकुमार हेगडे, आण्णासाहेब जोल्ले, मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी, दुर्योधन ऐहोळे, शशिकला जोल्ले, गणेश हुक्केरी यांसह मंत्री, मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. दरम्यान राज्य सरकारकडे नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार बेळगाव आगाराला नवीन 50 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बससेवेवरचा काहीअंशी ताण कमी होणार आहे. या बसेसमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

50 हून अधिक बसचालक गौरवास पात्र

पाच वर्षांत एकही अपघात किंवा गुन्हा न करता बस चालविणाऱ्या बसचालकांचा (ड्रायव्हर) सुरक्षा चालक म्हणून रौप्यपदक देऊन गौरव केला जाणार आहे. बेळगाव आगारातील सुमारे 50 हून अधिक बसचालक पात्र ठरणार आहेत. प्रशस्तीपत्र, 2 हजार रुपये आणि मासिक 500 रुपये प्रोत्साहन धन दिले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.