For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : सोलापूरमध्ये सोन्याच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक

07:01 PM Jan 12, 2026 IST | NEETA POTDAR
solapur   सोलापूरमध्ये सोन्याच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक
Advertisement

                      सोलापूरमध्ये  ५० लाखांचा फसवणूक प्रकार!

Advertisement

सोलापूर : सोने मिळवून देतो, कमी दरात सोन्याचे कॉईन व बिस्किटे देतो असे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल ५० लाख ९६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

फिर्यादी सचिन सुरेश अपराध (रा. १२०, टेळे नगर, शेटेवरती, लक्ष्मी पेठ, सोलापूर) व त्यांचे मित्र किशोर घोंगडे यांना आरोपींनी सप्टेंबर २०२३ पासून विश्वासात घेण्यास सुरुवात केली. आरोपी राकेश अण्णा (रा. काकीनाडा, आंध्र प्रदेश), दीपक घुटे (रा. रुईढोकी, धाराशिव) व आनंद निंबाळकर (रा. धाराशिव) यांनी "थेट स्त्रोतामधून सोने मिळते,

Advertisement

बाजारभावापेक्षा कमी दरात सोन्याचे कॉईन व बिस्किटे देऊ,' असे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
विश्वास वाढवण्यासाठी आरोपींनी फिर्यादीस सोन्याचे कॉईन व बिस्किटे प्रत्यक्ष दाखविले. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांत मोठ्या रकमेची मागणी केली. फिर्यादीने रोख व बँक व्यवहारातून पैसे दिल्यानंतर आरोपींनी त्याच्या बदल्यात नकली नोटा तसेच खोट्या सह्यांचे चेक दिले.

काही वेळातच दिलेली रक्कम परत मिळत नसल्याने फिर्यादीस संशय आला. यावेळी आरोपींनी 'पोलीस तक्रार केल्यास संपूर्ण रक्कम बुडेल, तसेच अडचणीत खाल' अशी भीती दाखवून फिर्यादी व त्याच्या मित्राला गप्प राहण्यास भाग पाडले. दीर्घकाळ आरोपी टाळाटाळ करीत राहिल्याने अखेर फिर्यादीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Advertisement
Tags :

.