महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडिगो, विस्तारा, एअर इंडियाच्या 50 विमानांमध्ये बॉम्बची धमकी

06:22 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

8 दिवसांमध्ये 120 हून अधिक विमानांकरता धमक्या : कठोर कायदा आणण्याची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

50 विमानांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी पुन्हा एकदा सोमवारी रात्री उशिरा देण्यात आली आहे. यात इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांचा समावेश आहे. मागील 8 दिवसांमध्ये आतापर्यंत 120 हून अधिक विमानोड्डाणांकरता बॉम्ब हल्ल्याची धमकी प्राप्त झाली आहे.

चार विमानोड्डाणांसंबंधी सुरक्षा अलर्ट मिळाला. यात मंगळूरहून मुंबईला येत असलेली 6ई164 फ्लाइट, अहमदाबादहून जेद्दा येथे जात असलेली 6ई 75 फ्लाइट, हैदराबाद येथून जेद्दा येथे जात असलेली 6ई67 फ्लाइट आणि लखनौहून पुण्याला येत असलेली 6ई 118 सामील असल्याची माहिती इंडिगोच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिली आहे.

सोमवारी काही विमानोड्डाणांना सोशल मीडियावरुन सुरक्षेसंबंधी धमकी मिळाली होती. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि सर्व प्रोटोकॉल्सचे कठोरपणे पालन केल्याचे विस्तारा आणि एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी सांगितले आहे.

एअरलाइन्सना मिळत असलेल्या धमक्या खोट्या असल्या तरीही आम्ही त्यांना कमी लेखणार नाही. आम्ही अशा कृत्यांच्या विरोधात कठोर कायदा आणणार आहोत असे नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी सोमवारी सांगितले होते. अशाप्रकारच्या धमक्या देणाऱ्या व्यक्तींची नावे ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये सामील करण्याचा विचार सुरू आहे. तर सरकार संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती करणार आहे. नागरी विमानोड्डाण सुरक्षा ब्युरो या मुद्द्याकरता सातत्याने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचे समजते.

केंद्र सरकारने उचलली पावले

केंद्र सरकारने 16 ऑक्टोबर रोजी फ्लाइट्समध्ये एअर मार्शल्सची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने बनावट धमक्यांप्रकरणी नागरी विमानो•ाण मंत्रालयाकडून अहवाल मागविला आहे. सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीकडूनही अहवाल मागविण्यात आला आहे. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने 19 ऑक्टोबर रोजी सर्व एअरलाइन्सच्या सीईओंसोबत बैठक घेतली आहे. यात खोट्या धमक्यांना हाताळण्यावरुन चर्चा करण्यात आली. तसेच प्रवाशांना होत असलेली असुविधा आणि एअरलाइन्सच्या नुकसानीबद्दलही चर्चा झाली.

डीजीसीए प्रमुखांना हटविले

केंद्र सरकारने 19 ऑक्टोबर रोजी डीजीसीए प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवत कोळसा मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्त केले. तर मुंबई पोलिसांनी खोट्या धमकीप्रकरणी एका इसमाला अटक केली आहे. छत्तीसगडच्या राजनांदगाव येथून एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनीही इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिली होती. तर केरळच्या कोची विमानतळावर सोमवारी एका प्रवाशाला बॉम्बची धमकी दिल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.

धमक्यांमुळे 200 कोटींचे नुकसान

विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने विमानाला निर्धारित विमानतळाऐवजी नजीकच्या विमानतळावर उतरविले जाते. यामुळे अधिक प्रमाणात इंधन वापरले जाते. तर विमानाची तपासणी करणे, प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि त्यांना निर्धारित शहरापर्यंत पोहोचविण्याचीही व्यवस्था करावी लागते. याकरता सुमारे 3 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येतो. चालू आठवड्यात विस्तारा, एअर इंडिया, इंडिगो, अकासा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअरच्या 70 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानो•ाणांना धमकी प्राप्त झाली आहे. धमक्यांमुळे आतापर्यंत 200 कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article